U-17 World Cup: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फातोर्डा स्टेडियम विद्यार्थ्यांनी फुलणार

स्पर्धेतील एकूण 16 सामने गोव्यात होणार
Fatorda stadium
Fatorda stadiumDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महिलांच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहेत. इतर देशांच्या सामन्यांना गर्दी व्हावी, तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना भावी स्टार खेळाडूंचा खेळ पाहता यावा या हेतूने गोवा क्रीडा प्राधिकरणाने स्पर्धेच्या स्थानिक आयोजन समितीच्या सहकार्याने हाती घेतलेल्या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला आहे.

(Fatorda stadium will be packed with students during U-17 World Cup football tournament )

Fatorda stadium
Margao municipality: ''पालिकेवर नियंत्रणासाठी वटहुकूम आणणे लाजिरवाणी गोष्ट''

गोव्यात स्पर्धेतील एकूण 16 सामने होतील, या सामन्यात विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात अपेक्षित असून त्यांच्यामुळे फातोर्डा स्टेडियम 11 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत गजबजणार आहे. फातोर्ड्यात 11 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत 12 साखळी सामने, नंतर दोन उपांत्यपूर्व सामने आणि 26 ऑक्टोबरला स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने खेळले जातील. स्पर्धेतील भारताचे सामने भुवनेश्वर येथे होतील, महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीसह एकूण 10 सामने होतील.

Fatorda stadium
Mormugao Municipality: ''गोवा शिपयार्डने गोव्यातील शिक्षित युवकांना नोकरी पासून वंचित ठेवले''
U-17 World Woman Cup
U-17 World Woman CupDainik Gomantak

शाळांकडून तिकिटांसाठी संपर्क

‘‘आम्हाला आतापर्यंत विविध शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. तिकिटांसाठी खूप शाळांनी संपर्क साधला. उदाहरणार्थ 18 रोजी होणाऱ्या दोन्ही साखळी सामन्यांसाठी कुजिरा संकुलातील सर्व शाळा आपल्या विद्यार्थ्यांना पाठविणार आहे. सामन्यांसाठी स्टेडियमवर जाणाऱ्या या संकुलातील विद्यार्थ्यांचा आकडा पाच हजाराच्या आसपास आहे,’’ असे गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांनी बुधवारी सांगितले.

गोव्यात 2017 साली 17 वर्षांखालील पुरुष विश्वकरंडक फुटब़ॉल स्पर्धेतील सामने झाले होते, पण बहुतेक सामन्यांसाठी फातोर्ड्यातील स्टेडियम रिकामेच होते. त्यातून राज्य क्रीडा प्रशासनाने बोध घेतला असून यावेळच्या विश्वकरंडकासाठी विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे ठरले.

एका दिवशी दोन सामने

फातोर्ड्यात स्पर्धेत एक दिवसआड दोन साखळी सामने खेळले जातील. पहिला सामना संध्याकाळी साडेचार वाजता, तर दुसरा सामना रात्री आठ वाजता सुरू होईल. तिकीट विक्री सुरू झाली असून दर प्रत्येकी 100 रुपये व 200 रुपये आहे.

फातोर्ड्यात ब गटातील जर्मनी, नायजेरिया, चिली व न्यूझीलंड, तर ड गटातील जपान, टांझानिया, कॅनडा व फ्रान्स या संघांचे सामने होतील. अमेरिका, मोरोक्को, कोलंबिया आणि मेक्सिको यांचा प्रत्येकी एक साखळी सामना गोव्यात खेळला जाईल. गोव्यात खेळणाऱ्या संघांपैकी फ्रान्सने 2012 साली, तर जपानने 2014 साली स्पर्धा जिंकली होती.

‘‘महिलांच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक सामन्यांसाठी प्रत्येक दिवसासाठी आम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन केले आहे. शाळानिहाय विद्यार्थी उपस्थितीचे सविस्तर वेळापत्रक एक-दोन दिवसांत निश्चित होईल.’’- अजय गावडे,कार्यकारी संचालक, गोवा क्रीडा प्राधिकरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com