U19 India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

U19 Women's T20 World Cup: भारतीय महिलांची फायनलमध्ये धडक! न्यूझीलंडचा दारूण पराभव

भारतीय महिला संघाने न्यूझीलंडला पराभूत करत 19 वर्षांखालील महिला वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

Pranali Kodre

India U19 vs New Zealand U19: दक्षिण आफ्रिकेत सध्या पहिला 19 वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकप सुरू असून या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने जागा पक्की केली आहे.

शुक्रवारी 19 वर्षांखालील भारतीय महिला विरुद्ध 19 वर्षांखालील न्यूझीलंड महिला संघात उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबर भारतीय संघाने अंतिम सामना गाठला. श्वेता सेहरावत आणि पार्शवी चोप्रा यांची कामगिरी भारताच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

उपांत्य सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडने विजयासाठी 108 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारतीय महिलांनी 14.2 षटकात 2 बाद 110 धावा करत सहज पूर्ण केले आणि सामना जिंकला.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. भारताने चौथ्याच षटकात कर्णधार शेफाली वर्माची (10) विकेट गमावली होती. पण त्यानंतर श्वेता सेहरावतने जबाबदारी घेत सौम्या तिवारीबरोबर महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली.

पण या दोघीही खेळपट्टीवर स्थिरावल्या असतानाच ऍना ब्राऊनिंगने सौम्याला 22 धावांवर त्रिफळाचीत करत 13 व्या षटकात माघारी धाडले. पण श्वेता आणि सौम्या यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 62 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला गेला.

सौम्या बाद झाल्यानंतर गोंगाडी त्रिशाबरोबर फलंदाजी करताना श्वेताने 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दरम्यान श्वेताने अर्धशतकी खेळीही केली. तिने 45 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 61 धावा केल्या. त्रिशा 5 धावांवर नाबाद राहिली. न्यूझीलंडकडून ऍना ब्राऊनिंगनेच भारताच्या दोन्ही विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण न्यूझीलंडची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी सलामीला फलंदाजीला आलेल्या एमा मॅकलीड आणि ऍना ब्राऊनिंग यांच्या विकेट्स झटपट गमावल्या.

पण, त्यानंतर जॉर्जिया प्लिमर आणि ईसाबेल गेज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघीही खेळपट्टीवर स्थिरावल्या होत्या. पण त्यांची भागीदारी मोठी होणार नाही, याची काळजी पार्शवीने घेतली आणि तिने ईसाबेल गेजला 26 धावांवर पायचीत केले. त्यानंतर तिने कर्णधार इजी शार्पला 13 आणि एमा इर्विनला 3 धावांवर बाद केले.

न्यूझीलंडची मधली फळी पार्शवीने झटपट बाद केली, त्यामुळे न्यूझीलंडला धावगती वाढवता आली नाही. त्यांनी नंतरच्या 4 विकेट्सही नियमित अंतराने गमावल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 107 धावाच करता आल्या. न्यूझीलंडकडून जॉर्जिया प्लिमरने सर्वाधिक 35 धावा केल्या.

भारताकडून पार्शवीने 4 षटकात 20 धावांत 3 विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्मा, मन्नत कश्यप आणि तितास साधू यांनीही शानदार गोलंदाजी केली. शफालीने 7 धावा देत एक, मन्नतने 21 धावांत एक आणि तितासने 17 धावांत एक विकेट घेतली.

आता भारताला इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजयी संघाशी रविवारी अंतिम सामना खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT