"त्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, म्हणून मी त्याला गोळ्या घातल्या'' मुलाच्या डोळ्यादेखत बापाची हत्या; आरोपीनं व्हिडिओ बनवून दिली गुन्ह्याची कबुली

Moradabad Businessman Murder: एका टायर व्यापाऱ्याची भररस्त्यात हत्या केल्यानंतर आरोपीने चक्क सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करुन गुन्ह्याची कबुली दिली.
Tyre Merchant Mohammad Anees Killed
Moradabad Businessman MurderDainik Gomantak
Published on
Updated on

Tyre Merchant Mohammad Anees Killed: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले की, एका टायर व्यापाऱ्याची भररस्त्यात हत्या केल्यानंतर आरोपीने चक्क सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करुन गुन्ह्याची कबुली दिली. कुंदरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. मोहम्मद अनीस असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवली. मात्र, पोलीस चौकी जवळ असतानाही आरोपी गोळीबार करुन आरामात पसार झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अनीस हे टायर व्यवसायाचे मोठे नाव होते आणि त्यांच्या चुलत भावाची पत्नी जिल्हा पंचायत सदस्य आहे. शुक्रवारी रात्री इफ्तारनंतर अनीस आपल्या कुटुंबासह मदरशात तरावीहची नमाज अदा करण्यासाठी गेले होते. रात्री नऊच्या सुमारास नमाज संपवून ते आपला भाऊ नफीस आणि मुलांसह घरी परतत होते. घराच्या दरवाजात पोहोचताच दबा धरुन बसलेल्या आरोपीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी आरोपीने अनीस यांचा भाऊ नफीस यालाही मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने पळ काढल्याने त्याचे प्राण वाचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनीस यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Tyre Merchant Mohammad Anees Killed
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

या हत्येनंतर काही वेळातच आरोपी मोहम्मद अरमान याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये त्याने हातात पिस्तूल दाखवत "मी अनीसवर तीन-चार गोळ्या झाडल्या असून या कृत्याला फक्त मीच जबाबदार आहे," असे उघडपणे म्हटले. या हत्येमागे जुन्या निवडणूक वैमनस्याचा संदर्भ असल्याचे त्याने सांगितले.

आरोपी (Accused) अरमानच्या दाव्यानुसार, निवडणुकीदरम्यान अनीसने त्याच्यावर चोरीचा आळ घालून त्याला मारहाण केली होती आणि त्याच्या वडिलांचा अपमान केला होता. तेव्हापासून मनात सूडाची भावना ठेवून आणि स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याने व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले की, या गुन्ह्यात त्याच्या कुटुंबाला किंवा नातेवाईकांना त्रास देऊ नये, कारण हा निर्णय त्याचा वैयक्तिक होता.

Tyre Merchant Mohammad Anees Killed
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

या घटनेची माहिती मिळताच एसपी कुंवर आकाश सिंह यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. जरी आरोपीने व्हिडिओद्वारे हत्येची कबुली दिली असली, तरी पोलीस (Police) सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपीचे घर कुंदरकी येथेच असून सध्या तो फरार आहे. एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com