U19 Women's T20 World Cup: भारतीय महिलांकडून स्कॉटलंडचा धुव्वा! सुपर सिक्समध्येही दिमाखात एन्ट्री

भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील महिला वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडला पराभूत करत सुपर सिक्समध्ये प्रवेश केला.
India Women U19
India Women U19Dainik Gomantak
Published on
Updated on

India Women U19 vs Scotland Women U19: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या पहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपमध्ये बुधवारी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील स्कॉटलंड महिला संघाविरुद्ध 85 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने डी ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवत सुपर सिक्स फेरीत प्रवेश केला.

बुधवारी बेनोनीमध्ये झालेला सामना भारताचा डी ग्रुपमधील अखेरचा साखळी सामना होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने कर्णधार शफाली वर्मा आणि सोनिय मेहदिया यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. पण, गोंगाडी त्रिशाने 51 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तिने या खेळीत 6 चौकार मारले.

India Women U19
U19 Women's T20 World Cup: शफाली-श्वेताची पुन्हा तुफानी फलंदाजी! भारतीय महिलांचा युएईवर दणदणीत विजय

त्रिशाला रिचा घोषची चांगली साथ मिळाली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. पण रिचा 35 चेंडूत 33 धावा करून बाद झाली. तिच्यानंतर लगेचच दोन चेंडूंनंतर त्रिशाही बाद झाली.

पण नंतर कमालीच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या श्वेता सेहरावतने 10 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली. तिने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यामुळे भारताला 20 षटकात 4 बाद 151 धावा करता आल्या. स्कॉटलंडकडून कॅथरीन फ्रेसरने 31 धावांत 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडने चांगली सुरुवात केली होती. त्यांची पहिल्या चार षटकात 24 धावा केल्या होत्या. सलामीला खेळायला आलेल्या एलिसा लिस्टरने 14 धावा आणि डार्सी कार्टरने 24 धावा केल्या. पण या दोघींशिवाय नंतर स्कॉटलंडच्या कोणत्यात फलंदाजाला 10 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

India Women U19
Women U19 WC 2023: श्वेता, शेफाली यांचा दक्षिण आफ्रिकेला तडाखा; वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांची विजयी सुरूवात

भारताची गोलंदाज मन्नत कश्यपने मधल्या षटकात शानदार गोलंदाजी केली. तिने तिच्या चार षटकात केवळ 12 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच भारताकडून अर्चना देवीनेही चांगली गोलंदाजी करत 14 धावांत 3 विकेट्स घेतल्या. सोनम यादवने 7 चेंडू टाकताना 2 विकेट्स घेतल्या.

त्यामुळे स्कॉटलंडचा डाव 13.1 षटकात 66 धावांवर संपला. स्कॉटलंडने त्यांच्या शेवटच्या 6 विकेट्स केवळ 16 धावांच्या अंतरात गमावल्या.

दरम्यान, या विजयामुळे भारताने डी ग्रुपमधील सर्व साखळी सामने जिंकत सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले आहे. पण स्कॉटलंडचे आव्हान संपले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com