U19 Women's T20 World Cup: भारतीय महिलांचा श्रीलंकेला धोबीपछाड, सेमीफायनलच्या आशाही जिवंत

भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील महिला वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेला पराभूत करत सेमीफायनच्या आशा उंचावल्या आहेत.
U19 India Women Team
U19 India Women TeamDainik Gomantak
Published on
Updated on

India U19 vs Sri Lanka U19: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपमध्ये सुपर सिक्स फेरीत 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाचा दुसरा सामना 19 वर्षांखालील श्रीलंका महिला संघाविरुद्ध झाला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला असून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

शनिवारी भारतीय संघाला सुपर सिक्समधील पहिल्या सामन्यात 19 वर्षांखालील महिला ऑस्ट्रेलिया संघाकडून 7 विकेट्सने दारुण पराभवाला समोरे जावे लागले होते. पण, या पराभवानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भारतीय संघ विजयी मार्गावर परतला.

U19 India Women Team
U19 Women's T20 World Cup: शफाली-श्वेताची पुन्हा तुफानी फलंदाजी! भारतीय महिलांचा युएईवर दणदणीत विजय

रविवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताला माफक 60 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने कर्णधार शफाली वर्मा (15) आणि रिचा घोष (4) यांच्या विकेट्स तिसऱ्या षटकातच गमावल्या होत्या.

तसेच श्वेता सेहरावतची (13) विकेट 7 व्या षटकात गेली. पण तोपर्यंत भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला होता. अखेर सौम्या तिवारीने नाबाद 28 धावांची खेळी करत 8 व्या षटकात भारताचा विजय निश्चित केला.

श्वेता आणि सौम्या यांच्यात 35 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. त्यामुळे भारताने 7.2 षटकात 3 विकेट्स गमावत 60 धावांचे आव्हान पूर्ण केले. श्रीलंकेकडून डेवमी विहंगा विजेरत्ने हिने 3 विकेट्स घेतल्या.

(U19 Women's T20 World Cup: India U19 Won by 7 wickets against Sri lanka U19)

U19 India Women Team
U19 Women's T20 World Cup: भारतीय महिलांकडून स्कॉटलंडचा धुव्वा! सुपर सिक्समध्येही दिमाखात एन्ट्री

तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी श्रीलंकेला 20 षटकात 9 बाद 59 धावांवर रोखले. भारताकडून पार्शवी चोप्राने चांगली गोलंदाजी करताना 4 षटकात 5 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तिने एक षटक निर्धावही टाकले. तिच्याशिवाय मन्नत कश्यपने 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तर अर्चना आणि तितास साधू यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

श्रीलंकेकडून विशमी गुरुनारत्नेने सर्वाधिक 25 धावा केल्या, तसेच उमया रथनायकेने 13 धावांची खेळी केली. या दोघींव्यतिरिक्त श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला दोनआकडी धावसंख्या पार करता आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com