बोरगोहेनने नियन-चिन चेनचा 4-1 अशा फरकाने पराभव करत भारताच्या पदकावर शिक्का मोर्तब केला.
बोरगोहेनने नियन-चिन चेनचा 4-1 अशा फरकाने पराभव करत भारताच्या पदकावर शिक्का मोर्तब केला. Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: बॉक्सिंगमध्ये लोव्हलिनाने केले भारताचे पदक निश्चित

दैनिक गोमन्तक

टोकियो: टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताची आजची सकाळ गुड न्यूज घेऊन आली आहे. दीपिका कुमारीने (Deepika Kumari) तिरंदाजीत (Archery) सेनिया पेरोवाचा (Ksenia Perova) शूट ऑफमध्ये 6-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. शूट ऑफमध्ये पहिला शॉट पेरोवाने घेतला. त्यात तिने फक्त 7 चा स्कोर केला. दीपिकाने याच संधीचा फायदा घेत 10 चा स्कोर केला.

पहिल्या सेटमध्ये दीपिकाने 9-10 तर सेनिया पेरोवाने 9-9, दुसऱ्या सेटमध्ये दीपिका 10-9 तर पेरोवाने 9-8, तिसऱ्या सेटमध्ये दीपिका 10-9, तर पेरोवा 9-9, चौथ्या सेटमध्ये दीपिका 9-8 तर पेरोवा 9-8, पचव्या सेटमध्ये दीपिकाला 7-10, तर पेरोवाला 9-10 असे गुण मिळाल्याने सामना शूट ऑफमध्ये गेला तेथे दीपिकाने 10-7 अशा फरकाने पेरोवाला पराभूत केले. दुसरीकडे तिरंदाजीत संघ सोमवारी दक्षिण कोरिया सोबत झालेल्या पराभवामुळे ऑलिंपिकमधून बाहेर झाला आहे.

बॉक्सिंगमध्ये भारताचे पदक निश्चित

दुसरीकडे बॉक्सिंगमध्ये (boxing) लोव्हलिना बोरगोहेन (lovelina borgohain) हिने (69 किलो) मध्ये चिनी तैपेईच्या नियन-चिन चेनला पराभूत करत भारताचे पदक निश्चित केले आहे. आज झालेल्या यासामन्यात बोरगोहेनने नियन-चिन चेनचा 4-1 अशा फरकाने पराभव करत भारताच्या पदकावर शिक्का मोर्तब केला. पहिल्या दोन राऊंडमध्ये लोव्हलिनाने आपला दबदबा राखत आक्रमक खेळ केला. तिसऱ्या सेटमध्ये देखील 23 वर्षीय लोव्हलिनाने चांगला खेळ करत भारताचे पदक निश्चित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

Sanjana Sawant Death Case: संजना सावंत मृत्यूप्रकरणी सात दिवसात आरोपपत्र दाखल करा, अन्यथा...

Goa Crime: राज्यात चोर, हल्लेखोरांचा सुळसुळाट, कायदा-सुव्यवस्था ढासळली! काँग्रेसचा घणाघात

SCROLL FOR NEXT