Tokyo Olympics: सिंधुची पदकाच्या दिशेने वाटचाल सुरु, दासचा अचूक निशाणा

पदार्पणात बॉक्सिंगमध्ये सतीश कुमारची (Satish Kumar in boxing) चमकदार कामगिरी, भारतीय पुरुषांच्या हॉकीसंघाने (Hockey) बलाढ्य अर्जेंटीनाला 3-1 अशी धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा पक्की केली आहे.
सिंधुने डेनमार्क मिया ब्लिचफेल्ट हिला सरळ सेटमध्ये नमवत अंतिम आठमध्ये जागा मिळविली आहे.
सिंधुने डेनमार्क मिया ब्लिचफेल्ट हिला सरळ सेटमध्ये नमवत अंतिम आठमध्ये जागा मिळविली आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

टोकियो: ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधु (Badminton player PV Sindhu) हिने आपली लय कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज तिने डेनमार्क मिया ब्लिचफेल्ट हिला सरळ सेटमध्ये नमवत अंतिम आठमध्ये जागा मिळविली आहे.

41 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधुने जगातील 12 व्या क्रमांकाची डेनमार्कची खेळाडू मिया ब्लिचफेल्टला 21-15, 21-13 असा सहज पराभव केला आहे. मिया विरुध्द सिंधुचा ही पाचवा विजय आहे.

दुसरीकडे भारताच्या साई प्रणीतला मात्र पराभावाचा सामना करावा लागला आहे. नेदरलँडच्या मार्क कैलजॉवने प्रणीतला 21-14, 21-14 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.

सिंधुने डेनमार्क मिया ब्लिचफेल्ट हिला सरळ सेटमध्ये नमवत अंतिम आठमध्ये जागा मिळविली आहे.
Tokyo Olympics: सिंधुची विजयी घौडदौड कायम, हॉकीत मात्र महिलांचा पराभव
पदार्पण करणाऱ्या सतीश कुमारची चमकदार कामगिरी
पदार्पण करणाऱ्या सतीश कुमारची चमकदार कामगिरीDainik Gomantak

पदार्पण करणाऱ्या सतीश कुमारची चमकदार कामगिरी

बॉक्सिंगमध्ये (Boxing) भारताकडून (India) प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळणाऱ्या सतीश कुमारने (Satish Kumar) रिकार्डो ब्राउनचा 4-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सतीशने 91 किलो पेक्षा जास्त वजनी गटात जमेकाच्या रिकार्डो ब्राउन 4-1 अशा फरकाने नमविले, सतीश कुमारने पहिल्या राऊंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. पण रिकार्डोच्या एका पंचवर सतीश जखमी देखील झाला. तरी तो शेवटपर्यंत लढत राहिला आणि त्याने 4-1 असा सामना जिंकला. सतीशने पदार्पणातच केलेल्या या कामगिरीमुळे त्याच्याकडून आता पदकाची अपेक्षा आहेत. एशियाई स्पर्धेत सतीशने दोनदा कांस्य पदक मिळविले आहे.

सिंधुने डेनमार्क मिया ब्लिचफेल्ट हिला सरळ सेटमध्ये नमवत अंतिम आठमध्ये जागा मिळविली आहे.
Tokyo Olympics: मेरी कॉमचा विजयी पंच, मनिकाचाही संघषपूर्ण विजय
अतनु दासचा तिरंदाजीत अचूक निशाणा
अतनु दासचा तिरंदाजीत अचूक निशाणा Dainik Gomantak

अतनु दासचा तिरंदाजीत अचूक निशाणा

तिरंदाजीत देखील आज भारताच्या अतनु दासने (Atanu Das) पुरुषांच्या व्यक्तिगत स्पर्धेत दक्षिण कोरीयाच्या ओह जिन हयेकचा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अतनु दासने के ओह जिन हयेकचा शूट आफमध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थन मिळविले आहे.

हॉकीत युवा ब्रिगेडने बलाढ्य अर्जेंटीनाला चारली धूळ
हॉकीत युवा ब्रिगेडने बलाढ्य अर्जेंटीनाला चारली धूळDainik Gomantak

हॉकीत युवा ब्रिगेडने बलाढ्य अर्जेंटीनाला चारली धूळ

भारतीय पुरुषांच्या हॉकीसंघाने (Indian men's hockey team) बलाढ्य अर्जेंटीनाला 3-1 अशी धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा पक्की केली आहे. भारताने मागील सामन्यात स्पेनचा पराभव करत पुन्हा लय पकडली तीच लय आजही कायम राखत भारतीय हॉकी संघाने रिओ ऑलिंपिकमधील पदक विजेत्या अर्जेंटीनाचा पराभवाचा धक्का दिला आहे. भारताच्या युवा ब्रिगेडने या विजयात प्रमुख सूत्रधाराची भूमिका निभावली आहे. या विजयामुळे भारतला चार दशकानंतर ओलिंपिक पदक जिंकण्याची भारताला चांगली संधी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com