Gadre Gaspar Dias Open 2022 
क्रीडा

मडगावचा तेजस शेवडे पाचव्यांदा गद्रे गास्पार ओपनचा विजेता

गास्पार डायस टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत रितिका डावलकरला विजेतेपद

Kishor Petkar

पणजी ः मडगावच्या तेजस शेवडे याने पाचव्यांदा गद्रे गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब जिंकला. अंतिम लढतीत त्याने गतविजेत्या कर्नाटकच्या प्रणीत वेणुगोपाळ याच्यावर 6-2, 7-6 (2) फरकाने मात केली.

मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस संकुलात झालेल्या स्पर्धेत महिला एकेरीत कोल्हापूरच्या 12 वर्षीय रितिका डावलकर हिने विजेतेपद (Winner) प्राप्त केले. अंतिम लढतीत तिने गोव्याच्या ऑलिव्हिया चौगुले हिच्यावर 6-1, 6-3 असा विजय नोंदविला.

पुरुष एकेरीत गतवर्षीच्या अंतिम लढतीत प्रणीतविरुद्ध खेळताना स्नायू दुखावल्यामुळे तेजसला माघार घ्यावी लागली होती व त्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बंगळूरविरुद्धच्या (Bangalore) प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तेजसने यावेळेस जोमदार खेळ करत विजेतेपद निसटू दिले नाही. पहिला सेट त्याने दोन गेमच्या मोबदल्यात जिंकला, मात्र दुसरा सेट कमालीचा रंगला. प्रणीतने आठ बिनतोड सर्व्ह केल्या. तेजसने नेटजवळील खेळावर भर दिला. दुसऱ्या सेटमध्ये 6-6 बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये तेजसने आघाडी घेतली आणि विजेतेपदही निश्चित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT