पाकिस्तानने विराटला का केलं दुःखी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक रोमांचक सामने जिंकले आहेत.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

विराट कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक रोमांचक सामने जिंकले आहेत. आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. दुसरीकडे मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्याने अनेक पराभवही पाहिले आहेत. अलीकडेच, T20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 मध्ये, टीम इंडिया (Team India) बाद फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. इतकचं नाही तर वर्ल्ड कप सामन्यामध्ये भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून (Pakistan) पराभव पत्करावा लागला. 2019 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडूनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही पाकिस्तानने टीम इंडियाचा दारुण पराभव केला होता. या तीन पराभवांचा साक्षीदार विराट कोहली होता. या तीन पराभवांनंतर प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीला मोठा झटका बसला होता, परंतु विराट कोहली (Virat Kohli) आपल्या कारकिर्दीतील कोणत्या दोन पराभवामुळे सर्वात जास्त दुःखी झाला हे तुम्हाला माहीत आहे का?

दरम्यान, विराट कोहलीने RCB वेबसाइटशी बोलताना सांगितले की, कोणते दोन पराभव तुझ्या जिव्हारी लागले त्यावर विराट म्हणाला, '2016 विश्वचषक सेमीफायनल आणि 2016 च्या आयपीएल फायनलमधील पराभव माझ्या जास्त जिव्हारी लागला.' विराटचे हे वक्तव्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. विराटने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे पराभव पाहिले आहेत, परंतु 2016 मध्ये मिळालेल्या दोन पराभवामुळे त्याला जास्त दुःखी केले.

Virat Kohli
IPL 2022: 'एमएस धोनीचं मार्गदर्शन मिळणं भाग्याचचं'

T20 विश्वचषक 2016 उपांत्य फेरीत काय घडले?

T20 विश्वचषक 2016 च्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर विराट कोहली दुःखी का झाला? तो सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 192 धावा केल्या होत्या परंतु वेस्ट इंडिजने हे लक्ष्य साध्य केले होते. त्या सामन्यात विराट कोहलीने 47 चेंडूत नाबाद 89 धावांची शानदार खेळी उभारली होती. पण जॉन्सन चार्ल्सच्या 52 धावांची खेळी. लेंडल सिमन्सच्या नाबाद 82 आणि रसेलच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने 2 चेंडूंपूर्वी सामना जिंकला. विराट कोहलीला त्याच्या घरच्या मैदानावर टी-20 विश्वचषक न जिंकल्याने खूप वाईट वाटले होते.

Virat Kohli
IPL 2021: एमएस धोनीनंतर 'हा' खेळाडू असेल चेन्नईचा कर्णधार

IPL 2016 च्या फायनलमध्ये काय घडलं?

IPL 2016 च्या फायनलमध्ये विराट कोहलीचा संघ विजेतेपद पटकावण्यापासून वंचित राहिला होता. हैदराबादविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात आरसीबीचा अवघ्या 8 धावांनी पराभव झाला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादने 208 धावा केल्या आणि आरसीबीने पहिल्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी करुनही सामना गमावला. त्या सामन्यात विराट कोहलीने 54 आणि गेलने 76 धावा केल्या होत्या. यानंतर आरसीबीची मधल्या फळीने योग्य ती कामगिरी केली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com