

Jasprit Bumrah Rejects Mumbai Indians Vice Captain Offer: रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला. हार्दिक पांड्या ट्रेडद्वारे पंजाब किंग्जमध्ये गेल्यामुळे मुंबईला नवीन कर्णधाराची गरज भासली आणि संघ व्यवस्थापनाने पाच वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितवर पुन्हा विश्वास दाखवला. रोहित कर्णधार झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मुंबई इंडियन्सची एक मोठी जबाबदारी नाकारल्याची माहिती समोर आली.
इंडिया टुडेच्या रिपोर्टुसार, रोहित शर्माकडे कर्णधारपद दिल्यानंतर मुंबई व्यवस्थापनाने ऑक्टोबरमध्ये बुमराहला उपकर्णधारपदाची ऑफर दिली होती. पण बुमराहने ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत केवळ एक खेळाडू म्हणूनच खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढच्या हंगामात तो रोहितचा उपकर्णधार नसेल. बुमराह अनेक वर्षांपासून संघाचा महत्त्वाचा भाग असून त्याचा अनुभव उपकर्णधारपदी उपयोगी पडला असता, पण सध्या त्याला ही अतिरिक्त जबाबदारी नको असल्याचे दिसते.
बुमराहला उपकर्णधारपदाचा प्रस्ताव देण्यामागे भविष्यात त्याला कर्णधारपदासाठी तयार करण्याचा हेतू असावा, असे मानले जाते. त्याने नकार का दिला, याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी फिटनेस आणि वर्कलोड हे महत्त्वाचे कारण असू शकते. 2027च्या वनडे वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करत कदाचित तो आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळण्याबाबत विचार करत नसावा आणि कोणताही धोका पत्करु इच्छित नसावा.
दरम्यान, 2023च्या आयपीएलनंतर हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वात संघ तीन हंगाम खेळला आणि केवळ एकदाच प्लेऑफमध्ये पोहोचू शकला. 2026 च्या हंगामातील खराब कामगिरीनंतर रोहितकडे पुन्हा नेतृत्व आले. तो पुढील काही काळ कर्णधार राहील की 2028च्या मेगा लिलावापूर्वी केवळ एका हंगामासाठी ही जबाबदारी सांभाळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.