Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Kerala Couple Arrested Goa Theft: भेंडाळे-वझरी येथे मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी केरळमधील एका दाम्पत्याला अटक केली आहे.
Kerala Couple Arrested Goa Theft
Goa TheftDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: भेंडाळे-वझरी येथे मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी केरळमधील एका दाम्पत्याला अटक केली आहे. आशिक जोसेफ अँथनी (३४) व त्याची पत्नी नेहा आर. रवी (३२) अशी संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी भेंडाळे-वझरी येथील सिद्धेश प्रताप भेंडाळकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ४ वा. या वेळेत ही घटना घडली. भेंडाळकर यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या आशिक याने ४५ हजार रुपयांची रोकड, तर रंग व हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या त्याच्या पत्नीने सोन्याची साखळी व पदक, १० हजारांची रोकड, आगाऊ दिलेले ७५ हजार रुपये, असा एकूण सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा आरोप आहे.

Kerala Couple Arrested Goa Theft
Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

गुन्हा दाखल झाल्यानंतर पेडणे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, आशिक याला १९ नोव्हेंबर रोजी, तर त्याची पत्नी नेहा हिला २४ नोव्हेंबर रोजी पेडणे पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली. याप्रकरणी पेडणे पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाहन चोरीच्या प्रकरणातही सहभाग

वाहन चोरीच्या एका प्रकरणात सावंतवाडी पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केल्याची माहिती तपासादरम्यान मिळाली. सावंतवाडी पोलिसांनी आशिक याच्याकडून १ लाख ५८ हजार रुपयांची रोकडही जप्त केली होती. पेडणे पोलिसांनी सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायिक दंडाधिकारी न्यायालयातून संशयितांचा ताबा मिळवला.

Kerala Couple Arrested Goa Theft
ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.