Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs West Indies 2nd Test: दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया करणार 'हा' मोठा रेकॉर्ड, आतापर्यंत दोन देशांविरुद्ध अशी कामगिरी केली!

Manish Jadhav

India vs West Indies 2nd Test: क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज संघ 20 जुलैपासून आमनेसामने असतील. कसोटी मालिकेतील हा दुसरा आणि शेवटचा सामना असेल.

हा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर (Queen’s Park Oval, Trinidad and Tobago) खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडिया (Team India) एक मोठा विक्रम करणार आहे. त्याचबरोबर टीम इंडियाची नजर सीरिज क्लीन स्वीप करण्यावरही असेल.

टीम इंडिया हा मोठा विक्रम करणार आहे

वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीत क्लीन स्वीप करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल, तर हा सामना दोन्ही संघांमधील शंभरावा कसोटी सामना आहे.

याआधी भारतीय संघाने केवळ ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडविरुद्धच हा आकडा गाठला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माला ही मोठी संधी असून, पहिल्या सामन्याप्रमाणेच आपला दबदबा कायम ठेवण्याचा तो प्रयत्न करेल.

अजिंक्य रहाणेकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

डोमिनिका येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटीनंतर भारताला आता डिसेंबर-जानेवारीमध्येच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी खेळायची आहे.

म्हणजेच रहाणेसारख्या खेळाडूला त्या मालिकेतील संघात निवडीचा दावा सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे.

गेल्या 18 महिन्यांतील पहिली कसोटी खेळणाऱ्या रहाणेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली, परंतु भारताने एका डावात फलंदाजी केल्यामुळे त्याला डोमिनिकामध्ये संधी मिळू शकली नाही.

टीम इंडियाची नजर पहिल्यांदा फलंदाजी करण्यावर असणार

भारतीय संघ पुन्हा एकदा फलंदाजी करेल, अशी दाट शक्यता आहे. अशा स्थितीत रहाणेला पुरेपूर फायदा घ्यावा लागेल कारण श्रेयस अय्यरही आफ्रिका दौऱ्यापूर्वी तंदुरुस्त होईल.

फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी या सामन्यापूर्वी सांगितले होते की, आफ्रिका दौऱ्यासाठी भारताला रहाणे फॉर्ममध्ये असणे आवश्यक आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, केएस भरत, ईशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उन्माद, मुकेश कुमार. नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज: क्रेग ब्रॅथवेट (क), जर्मेन ब्लॉकवुड, जोशुआ डासिल्वा, अलिक अथानाज, रहकीम कॉर्नवेल, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, रेमन रेफर, केमार रोच, टी चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, जोमेल वॅरिकन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT