Suryakumar Yadav unfollow Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: सूर्याचा मुंबई इंडियन्सला 'जय महाराष्ट्र'? Instagram वर अनफॉलो करत डिलीट केल्या सर्व पोस्ट्स!

Suryakumar Yadav unfollow Mumbai Indians: भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्याबाबत आता एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे.

Sameer Amunekar

मुंबई: भारतीय क्रिकेट विश्वात सध्या एकाच नावाच्या चर्चांना उधाण आले आहे, ते नाव म्हणजे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आपल्या कप्तानीखाली भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्याबाबत आता एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. विश्वचषक जिंकून दिल्यानंतरही निवडकर्त्यांनी त्याला तडकाफडकी कप्तानीवरून हटवले आणि त्यानंतर त्याला खेळण्याची संधीही मिळाली नाही. या मोठ्या घडामोडीनंतर आता सूर्यकुमारने आयपीएलमधील आपली जुनी फ्रँचायझी 'मुंबई इंडियन्स' (MI) सोबतचे नाते तोडण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

'मुंबई इंडियन्स'ला अनफॉलो केलं

सूर्यकुमार यादवने नुकताच सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला आहे, ज्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. सूर्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून 'मुंबई इंडियन्स'ला अनफॉलो केले आहे. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या बायोमधून 'MI' चा उल्लेख पूर्णपणे काढून टाकला आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, मुंबई इंडियन्सच्या जर्सीमधील किंवा त्या संघाशी संबंधित असणारे आपले जुने सर्व फोटो आणि पोस्ट सूर्याने डिलीट केल्या आहेत. भारतीय संघाचे कर्णधारपद गमावल्यानंतर सूर्याने उचललेल्या या पावलामुळे तो आता मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, त्याने हार्दिक पांड्यालाही अनफॉलो केले असून, यामुळे संघांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.

आयपीएल २०२६ मधील खराब कामगिरीचा फटका?

आयपीएल २०२६ चा हंगाम सूर्यकुमार यादव आणि मुंबई इंडियन्स या दोघांसाठीही अत्यंत निराशाजनक राहिला. या संपूर्ण हंगामात सूर्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

त्याने खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये केवळ २०.७७ च्या सरासरीने २७० धावा केल्या, ज्यामध्ये फक्त दोन अर्धशतकांचा समावेश होता. या खराब फॉर्ममुळे आणि संघाच्या सुमार कामगिरीमुळे मुंबईचे समीकरण बिघडले होते. आता या खराब फॉर्मनंतर मुंबई इंडियन्स त्याला आगामी आयपीएल २०२७ च्या महालिलावापूर्वी (Mega Auction) किंवा ट्रेड विंडो दरम्यान दुसऱ्या संघात पाठवण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई सोडल्यास सूर्या कोणत्या संघात जाणार? तीन नावे शर्यतीत!

जर सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचा गड सोडला, तर त्याला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रँचायझी उत्सुक असतील. सध्या सोशल मीडियावरील गणितांनुसार, तीन संघ त्याच्यासाठी सर्वात पुढे दिसत आहेत:

  • लखनौ सुपर जायंट्स (LSG): आयपीएल २०२६ मध्ये लखनौची कामगिरी अतिशय सुमार झाली आणि ऋषभ पंतने कर्णधारपद सोडल्यामुळे या संघाला एका दमदार कर्णधाराची आणि अनुभवी फलंदाजाची गरज आहे. सूर्या त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

  • चेन्नई सुपर किंग्स (CSK): चेन्नईचा संघ नेहमीच अनुभवी खेळाडूंवर मोठी बोली लावण्यासाठी ओळखला जातो. मधल्या फळीला मजबुती देण्यासाठी सीएसके सूर्यकुमारवर डाव खेळू शकते.

  • कोलकाता नाईट रायडर्स (KKR): कोलकातासाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात हा हंगाम फारसा चांगला गेला नाही. सूर्याने यापूर्वी गौतम गंभीरसोबत केकेआरसाठी खेळले आहे, त्यामुळे तो पुन्हा एकदा आपल्या जुन्या संघात घरवापसी करण्याची दाट शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT