Goa Elections: राजकीय आरक्षणासाठी समाज बांधवांची 'एकजूट', नेत्रावळीत सभा; 'एसटींना' निवडणुकीत न्यायाची मागणी

Goa ST Political Reservation Netravali:आगामी विधानसभा निवडणुकीत एसटींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी मागणी रविवारी समाज बांधवांनी नेत्रावळीत एकत्र येत केली.
Goa ST Political Reservation Netravali
Goa ElectionsDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: आगामी विधानसभा निवडणुकीत एसटींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी मागणी रविवारी समाज बांधवांनी नेत्रावळीत एकत्र येत केली. २०२७ च्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळाले नाही, तर सर्व समाजबांधव एकत्र येऊन समाजासाठी पर्याय निर्माण करतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच या मागणीसाठी एकजूट कायम राखण्याचा ठरावही एकमताने हात उंचावून पारित करण्यात आला.

राजकीय आरक्षण मिळावे म्हणून गेली कित्येक वर्षे अनुसूचित जमातीचे बांधव प्रयत्न करीत आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार असे वाटत असताना अनेकजण विविध कारणांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सांगे मतदारसंघातील सर्व पक्षांतील एसटी बांधव एकजूट आहेत. त्याचाच प्रत्यय रविवारी नेत्रावळीत आला.

Goa ST Political Reservation Netravali
ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणाची अधिसूचना काही दिवसांतच! दिल्लीत सकारात्मक चर्चा; शिष्‍टमंडळ भेटले शहांना

येथील दूध संस्थेच्या सभागृहात झालेल्या सभेला माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्या राजश्री गावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, मळकरणेचे सरपंच राजेश गावकर, भाटीचे सरपंच चंद्रकांत गावकर, कावरे-पिर्लाचे सरपंच विधी गावकर, ॲड. आनंद गावकर आदी उपस्थित होते.

माजी आमदार वासुदेव मेंग गावकर म्हणाले की, एसटी बांधव इतर समाजाचा हक्क मागत नसून, घटनेने दिलेला अधिकार मागत आहेत. यासाठी समाजाने अनेक आंदोलने केली. प्रसंगी दोन जवान तरुणांचे बलिदानही झाले. त्यानंतरही विविध स्तरांवर मागण्या सुरूच होत्या. आता या सर्व प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागल्याने अनेकजण विरोध करू लागले आहेत. इतरांचा विरोध पाहून न घाबरता आपला लढा पुढे नेताना आपण एकजूट कायम राखूया, असे आवाहनही त्यांनी केले.

Goa ST Political Reservation Netravali
ST Reservation: 'एसटी' नेत्‍यांचा रेटा! आरक्षणासाठी मोर्चेबांधणी सुरू; निवडणुकीपूर्वी अंमलबजावणीची मागणी

कोण काय म्हणाले...

आनंद गावकर म्हणाले की, आम्ही आमचा हक्क मागत आहोत; मात्र काही जण नाहक विरोध करीत आहेत. या विरोधामागे कोण आहे, हे आता सर्वश्रुत आहे. मात्र, सर्वपक्षीय एकजूट निर्माण झाली असून त्या एकजुटीचा फायदा समाजासाठी होऊ द्यावा. आगामी निवडणुकीत आमचा हक्क हिरावून घेतला गेला, तर योग्य पर्याय निर्माण केला जाईल.

माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर म्हणाले की, राजकीय आरक्षण हे घटनेनुसार आम्हाला मिळणार आहे आणि आमचा सरकारवर विश्वास आहे. समाजहित डोळ्यांसमोर ठेवून जी एकजूट दाखविली आहे, ती कायम राखण्याचे त्यांनी आवाहन केले. राजेश गावकर म्हणाले की, एसटी समाज कधीही दुसऱ्या समाजाच्या विरोधात नाही. मात्र, आज आम्ही आमचा हक्क मागत आहोत. प्रसंगी त्यासाठी मोठी शक्ती उभी करावी लागली, तरी ती उभी करण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com