Suryakumar Yadav Record, WI vs IND: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून म्हणजेच 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला T20 सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव एक मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.
भारतीय संघाने कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा 1-0 असा पराभव केला. यानंतर वनडे मालिकाही 2-1 ने जिंकली. आता दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे.
संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश असून वरिष्ठांना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-20 मालिकेत मोठा विक्रम करु शकतो. रोहित शर्माच्या मित्राचा रेकॉर्ड त्याच्या निशाण्यावर आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर (भारतीय वेळेनुसार) रात्री 8:00 वाजता खेळवला जाईल.
या सामन्यात सूर्यकुमार यादव सलामीवीर रोहित शर्माच्या खास मित्रांपैकी एक असलेल्या शिखर धवनला मागे सोडू शकतो.
T20 मालिकेत फक्त 85 धावा केल्यानंतर, सूर्यकुमार यादव भारताकडून T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवनला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचेल.
सूर्यकुमारने आतापर्यंत 48 सामन्यांच्या 46 डावांमध्ये 46.52 च्या सरासरीने 1675 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, धवनने 68 टी-20 सामन्यांच्या 66 डावांमध्ये 27.92 च्या सरासरीने 1759 धावा केल्या आहेत.
या यादीत टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 4008 धावा केल्या आहेत.
तो जगभरात T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्यानंतर रोहित शर्माचे (3853 धावा) नाव येते. केएल राहुल (72 सामन्यात 2265 धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.