WI vs IND: पदार्पणाची तीन खेळाडूंना संधी! पहिल्या टी-20 साठी कशी असेल भारताची Playing XI?

India vs West Indies: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला टी20 सामना 3 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

West Indies vs India, 1st T20I Match, Probable XI: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेत भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवले. यानंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज संघात 5 टी20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. पहिला टी२० सामना ३ ऑगस्ट म्हणजे आज त्रिनिदादमधील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे

दरम्यान, या टी20 मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा अशा काही वरिष्ठ खेळाडूंचा समावेश नाही. त्यामुळे या टी20 मालिकेतून अनेक युवा खेळाडू खेळताना दिसू शकतात.

तसेच काही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचीही संधी आहे. यात यशस्वी जयस्वास, मुकेश कुमार आणि तिलक वर्मा या खेळाडूंचा समावेश आहे. पण पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघव्यवस्थापन कोणाला संधी देणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

Team India
WI vs IND, 3rd ODI: भारताचा मालिका विजय! फलंदाजांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी उडवली विंडिजची दाणादाण

जयस्वालचा फॉर्म पाहाता आणि त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेतील कामगिरी लक्षात घेऊन त्याला सलामीला संधी मिळू शकते. त्याच्यासह यष्टीरक्षक इशान किशन खेळू शकतो. इशानने नुकतेच वनडे मालिकेत सलग 3 अर्धशतके केली आहेत. तसेच शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो.

मधल्या फळीत सुर्यकुमार यादव असेल. सूर्यकुमारचा वनडेत फॉर्म फारसा चांगला राहिलेला नसला, तरी तो टी20 क्रिकेटमध्ये मात्र, धोकादायक फलंदाज आहे. याशिवाय तिलक वर्मा किंवा संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हा मोठा पेच संघव्यवस्थापनासमोर असेल.

तिलक आक्रमक खेळू शकतो, पण सॅमसनचा अनुभव पाहाता, त्याला आधी प्राधान्य दिले जाऊ शकते. त्याचबरोबर मधल्या फळीत कर्णधार हार्दिक देखील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी असेल. तो वेगवान गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

Team India
Team India Video: विराट, रोहितसह टीम इंडिया ब्रायन लाराच्या भेटीला; फॅन्सचाही दिवस बनवला 'स्पेशल'

तथापि भारतीय संघव्यवस्थापनासमोर मोठा पेच असेल, तो फिरकी गोलंदाजीत कोणाला संधी द्यायची. भारताकडे अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई असे चार पर्याय आहेत.

दरम्यान, अक्षरकडे अष्टपैलू खेळाडूची असलेली क्षमता पाहाता, त्याला संधी मिळू शकतो. तसेच रबी बिश्नोईला पहिल्या टी२० सामन्यासाठी तरी बेंचवरच बसवण्याची शक्यता आहे. पण चहल किंवा कुलदीप यांच्यातील एकाची निवड भारतीय संघव्यवस्थापनेला करावी लागणार आहे.

प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाजी फळीत अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि मुकेश कुमार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

यशस्वी जयस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल / कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com