West Indies vs India T20I Series Details: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेत भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवले. दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने, तर 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. आता यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज संघात 5 टी20 सामन्यांची मालिका रंगणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघात टी२० मालिकेला आजपासून म्हणजेच ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना त्रिनिदाद मधील ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी मैदानात खेळला जाणार आहे.
त्यानंतर 6 आणि 8 ऑगस्ट रोजी होणारा दुसरा आणि तिसरा सामना गयाना मधील नॅशनल स्टेडियम येथे खेळवला जाणार असून चौथा आणि पाचवा सामना अमेरिकेतील फ्लोरिडामधील ब्रोवार्ड काउंटी स्टेडियममध्ये अनुक्रमे 12 आणि 13 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.
या सर्व 5 सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सामने भारतीय चाहत्यांना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहाता येणार आहेत. तसेच या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा आणि फॅनकोड ऍपवरही करण्यात येणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघात आत्तापर्यंत 25 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 17 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. तसेच 7 सामने वेस्ट इंडिजने जिंकले. त्याचबरोबर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.
तसेच या दोन संघात झालेल्या गेल्या 5 टी20 मालिकेत भारतीय संघानेच विजय मिळवला आहे. 2017 नंतर वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध टी20 मालिका जिंकता आलेली नाही.
भारत - इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज - रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅकॉय, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशान थॉमस.
टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
3 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद
6 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना
8 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना
12 ऑगस्ट - चौथा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
13 ऑगस्ट - पाचवा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.