Kadamba Protest: कदंब कर्मचाऱ्यांचा एल्गार! आझाद मैदानावर धरणार धरणे; बस सेवा राहणार सुरळीत Video

Kadamba employees protest: निषेध आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मडगाव डेपोवर बैठक झाली.
Kadamba employees protest
Kadamba employees protestDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : सातव्या वेतन आयोगाच्या पगार श्रेणी मिळाल्यानंतर ३४ महिन्यांची जी थकबाकी अडवून ठेवली आहे, ती कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळावी, यासाठी महामंडळाचे कर्मचारी २३ ते २७ मार्च या कालावधीत पणजी येथील आझाद मैदानावर पाच दिवसांचे धरणे आंदोलन करणार आहेत.

या निषेध आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मडगाव डेपोवर बैठक झाली.

Kadamba employees protest
Kadamba Transport Scheme: खूषखबर..! कंदबतर्फे कामगारांना बस प्रवासात 50 टक्के सूट, लाखो लाभार्थ्यांना मिळणार लाभ; योजना अंतिम टप्प्यात

हे पाच दिवसांचे निषेध आंदोलन करण्यात येणार असले तरी नियमित बस सेवेवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे चोडणकर यांनी सांगितले. महामंडळाचे कर्मचारी आळीपाळीने या आंदोलनात भाग घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Kadamba employees protest
Kadamba Bus: याचिकेने आणली ‘कदंब’ला जाग! आसगाव–म्हापसा मार्गावर अतिरिक्त बस सुरू; सुनावणीनंतर उचलले पाऊल

कदंब महामंडळात आठ वर्षांपेक्षा जास्त काळ अस्थायी स्वरूपात कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com