VIDEO: "यासाठी मी क्रिकेट खेळतोय"! जसप्रीत बुमराहने सांगितले कारण; व्हिडीओ होतोय तुफान Viral

Jasprit Bumrah: बीसीसीआयकडून जसप्रीत बुमराच्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये तो आवर्जून नमूद करतो, की मला नेहमीच कठीणप्रसंगी उभे राहायला आवडते.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

अहमदाबाद: भारतीय टी-२० विश्‍वविजेत्या संघाचा प्रमुख सदस्य जसप्रीत बुमरा याने याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना म्हटले, की जय-पराजयामधील जे अंतर असते, ते माझ्या कामगिरीमुळे ठरत असेल, तर याचा आनंद मोठा असतो. तसेच टी-२० विश्‍वकरंडकाचे जेतेपद राखण्याचे समाधान अधिक आहे.

बीसीसीआयकडून जसप्रीत बुमराच्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये तो आवर्जून नमूद करतो, की मला नेहमीच कठीणप्रसंगी उभे राहायला आवडते. दबावाखाली मागे राहायला आवडत नाही. याच कारणासाठी मी क्रिकेट खेळत आहे. क्रिकेट या खेळाची सुरुवातही याचमुळे केली. जय-पराजयामधील फरक ठरणारे प्रदर्शन करण्याचा आनंद अधिक असतो. यापेक्षा मोठा क्षण माझ्यासाठी नाही.

कुटुंबीयांची उपस्थिती

टी-२० विश्‍वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रसंगी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कुटुंबीयांची उपस्थिती होती. याबाबत जसप्रीत बुमराने नमूद केले, की २०२३मधील अंतिम फेरीत माझा मुलगा स्टेडियममध्ये उपस्थित होता. यंदाही माझे कुटुंबीय येथे उपस्थित होते.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah: "कॅप्टनला फक्त त्याचाच भरवसा वाटतो"! बुमराहचे दिग्गज खेळाडूने केले कौतुक; म्हणाला, 'इतके सातत्य कुणाकडेच नाही'

गुजरात माझ्यासाठी स्पेशल

जसप्रीत बुमरा याने गुजरातबाबतही मनातील भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी भावुक प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, की गुजरातमधूनच मी क्रिकेटची सुरुवात केली. गुजरातमध्ये मी बहुतांशी प्रमाणात क्रिकेट खेळलो. २०२३मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकात अंतिम फेरीमध्ये आम्हाला अहमदाबादमधील स्टेडियममध्ये अपयश आले; मात्र यंदा याच स्टेडियममध्ये आम्ही टी-२० विश्‍वकरंडक पटकावला. अंतिम सामन्यात मला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, याचा आनंद काही औरच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com