Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: 'वडिलांनी मेसेज केला, तेव्हा...' उपकर्णधारपदावर सूर्यकुमारची प्रतिक्रिया

श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचे उपकर्णधारपद दिल्याबद्दल सूर्यकुमारने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav: भारतीय संघाला 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. दरम्यान, निवड समीतीने टी20 मालिकेसाठी अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या मालिकेसाठी हार्दिक पंड्याला कर्णधारपद आणि सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

सूर्यकुमारला पहिल्यांदाच भारतीय संघात एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. याबद्दल त्यानेही आनंद व्यक्त केला आहे. त्याने म्हटले आहे की हे स्वप्नवत आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमारला ही बातमी त्याच्या वडिलांकडून कळाली.

सध्या सूर्यकुमार रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघाविरुद्ध मुंबईकडून खेळत आहे. त्याने या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर त्याला भारतीय संघाचे उपकर्णधारपद मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने सांगितले, 'उपकर्णधारपद मला अपेक्षित नव्हते. मी फक्त इतकेच म्हणू शकतो की मी वर्षभरात ज्याप्रकारे खेळलो आहे, त्याचेच हे बक्षीस आहे. मला छान वाटत आहे आणि यासाठी मी उत्सुक आहे.'

'मी संघाची यादी पाहिल्यांनंतर मला ही बातमी कळाली. माझ्या वडिलांनी मला संघाची यादी पाठवली होती. कारण ते सोशल मीडियावर सक्रिय असतात.'

याबरोबरच सूर्यकुमारने त्याच्या वडिलांनी त्याला पाठवलेल्या संदेशाबद्दलही सांगितले. त्याने सांगितले संघाच्या यादीसह त्याच्या वडिलांनी त्याला संदेश लिहिला होता की 'जास्त दबाव घेऊ नकोस, तुझ्या फलंदाजीची मजा घे.'

त्याचबरोबर सूर्यकुमार म्हणाला, 'ही बातमी मिळाल्यानंतर एका क्षणासाठी मी डोळे बंद केले होते आणि स्वत:लाच विचारले होते की हे स्वप्न आहे का? ही खूप सुंदर भावना आहे.'

सूर्यकुमार हा 2022 वर्षात भारताकडूनच नाही, तर जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 2 शतके आणि 9 अर्धशतकांसह 1164 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: सभापती गणेश गावकरांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

Chain Snatching: चोरट्यांचा धुमाकूळ! वृद्ध महिलेची 2 लाखांची चेन हिसकावली; नावेलीतील तिसरी घटना, परप्रांतीय टोळी असल्याचा संशय

Police Misconduct Case: पोलिस उपनिरीक्षकाला ढकलले, जीपवर मारले हातोडे; धमक्या दिल्या; 5 जणांविरोधात खटला चालवण्याचा आदेश

Edberg Pereira Case: 'नीलेश शिरवईकरला बडतर्फ करा'! नावेलीवासीयांची मागणी; एडबर्ग मारहाणीच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; पेडणे तालुका नेहमीच चर्चेत

SCROLL FOR NEXT