Suryakumar Yadav
Suryakumar Yadav  Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: 6,6,6,6,6,6,6,6,6 'SKY' ची ऐतिहासिक खेळी, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

दैनिक गोमन्तक

Suryakumar Yadav Century vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. 2023 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यात सूर्यकुमारने श्रीलंकेच्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. सूर्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

सूर्यकुमार यादवची शतकी खेळी

या सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी आला. जेव्हा तो मैदानावर आला तेव्हा टीम इंडियाने 52 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर सूर्यकुमार यादवची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने 51 चेंडूंचा सामना करत नाबाद 112 धावा केल्या. या शतकी खेळीत सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 7 चौकार आणि 9 षटकार मारले.

अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. त्याने भारतासाठी एकूण 4 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवचे हे तिसरे टी-20 शतक आहे. यासह हा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याशिवाय, केएल राहुलने 2 टी-20 शतके झळकावली आहेत. तर विराट कोहली आणि दीपक हुड्डा यांनीही भारताकडून 1-1 शतके झळकावली आहेत.

या दोन संघांविरुद्धही शतके झळकावली आहेत

सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिले टी-20 शतक झळकावले होते. इंग्लंडविरुद्ध त्याने 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात त्याने 48 चेंडूत शतक झळकावले होते. यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध या वर्षाच्या अखेरीस माउंट माउंगानुई येथे शतक झळकावले होते. त्या सामन्यात सूर्याने 51 चेंडूत 111 धावांची नाबाद खेळी खेळली होती. सूर्याने न्यूझीलंडविरुद्ध 49 चेंडूत शतक पूर्ण केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT