Suryakumar Yadav, Ranji Trophy 2022-23: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट जेव्हा बोलते, तेव्हा दिग्गज गोलंदाजही घाबरतात. रणजी ट्रॉफी सामन्यातही त्याने अशीच कामगिरी केली आहे. सूर्यकुमार शतकाच्या जवळ पोहोचला होता, पण तो ते पूर्ण करु शकला नाही. रणजी स्पर्धेत सूर्यकुमार मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय टी-20 संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सूर्यकुमारने 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि बीसीसीआयने (BCCI) त्याला बक्षीस दिले.
वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने अप्रतिम फलंदाजी केली. मुंबई संघाने पहिल्या डावात 230 धावा केल्या. सर्वाधिक धावा सूर्यकुमारच्या बॅटमधून आल्या. त्याने 107 चेंडूंचा सामना करत 14 चौकार, 1 षटकार लगावला. त्याचे शतक अवघ्या 5 धावांनी हुकले. विशेष म्हणजे, सूर्यकुमारने बाऊंड्रीवरुनच 15 चेंडूत 62 धावा केल्या. मैदानावर पुन्हा एकदा त्याचे रौद्र रुप दिसले. सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने अप्रतिम खेळी केली.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या या सामन्यात सौराष्ट्राचा कर्णधार अर्पित वसावडा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचा पहिला डाव 289 धावांवर आटोपला. अर्पितने सर्वाधिक 75 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी शम्स मुलानीने 4 बळी घेतले. यानंतर मुंबईचा संघ पहिल्या डावात 230 धावांत सर्वबाद झाला. धर्मेंद्रसिंग जडेजा आणि युवराज डोडियाने 4-4 विकेट घेतल्या. सौराष्ट्रने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 6 गडी बाद 120 धावा केल्या होत्या. त्याच्याकडे एकूण 179 धावांची आघाडी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.