Suryakumar Yadav: सिलेक्टर्संना सूर्याची मोहिनी; पुन्हा करुन दाखवलं !

Suryakumar Yadav Team India: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत संघाचा भाग नाही.
Suryakumar Yadav
Suryakumar Yadav Dainik Gomantak
Published on
Updated on

Suryakumar Yadav Team India: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत संघाचा भाग नाही. सूर्यकुमार यादवची एकदाही कसोटी संघात निवड झालेली नाही. न्यूझीलंड दौऱ्यापासून तो विश्रांतीवर होता, मात्र आता तो दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतला आहे. यावेळी त्याने अशा स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा तो गेल्या 3 वर्षांपासून भाग नव्हता.

तब्बल 3 वर्षानंतर या स्पर्धेत परतला

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जवळपास तीन वर्षात पहिला रणजी सामना खेळताना 80 चेंडूत 90 धावांची खेळी केली. हैदराबादविरुद्धच्या रणजी ट्रॉफी गट ब गटातील सामन्यात त्याने 112.50 च्या स्ट्राईक रेटने 15 चौकार आणि 1 षटकार मारला. फेब्रुवारी 2020 मध्ये शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळलेल्या सूर्यकुमारने अनेकदा भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे त्याची ही खेळी निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकते. भारताचा सर्वोत्कृष्ट T20 फलंदाज सूर्यकुमार याने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये तीच आक्रमकता दाखवली, ज्यासाठी तो लहान फॉरमॅटमध्ये ओळखला जातो.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: बांगलादेश दौऱ्यावर न गेलेला सूर्यकुमार आता खेळणार रहाणेच्या नेतृत्वात?

सूर्याचा जलवा कायम!

2022 मध्ये सूर्यकुमार यादव हा टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. या वर्षी त्याने 31 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1,164 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 9 अर्धशतके आणि 2 शतके आली. सूर्यकुमार यादव या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने यावर्षी वनडेमध्ये 13 सामने खेळून 280 धावा केल्या आहेत. जरी तो अद्याप टीम इंडियासाठी एकही कसोटी सामना खेळू शकला नाही.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: T20 क्रमवारीत सूर्याचा बोलबाला, पांड्यालाही लाभ!

सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या फलंदाजांना यश आले

सूर्यकुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून (Mumbai) खेळतो. बीकेसी मैदानावर झालेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पृथ्वी शॉला (19) लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वाल सूर्यकुमारसह दुसऱ्या विकेटसाठी 153 धावांची आणि रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी करुन मुंबईला मजबूत स्थितीत आणले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईने तीन गड्यांच्या मोबदल्यात 396 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com