Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

Team India: भारताचा हा दिग्गज खेळाडू T20 क्रिकेटमधून घेणार निवृत्ती!

टीम इंडियामध्ये आता युवा खेळाडूंना टी-20 क्रिकेटसाठी संधी दिली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Team India In T20 World Cup 2022: टीम इंडियामध्ये आता युवा खेळाडूंना टी-20 क्रिकेटसाठी संधी दिली जात आहे. टीम इंडियाला या वर्षाच्या अखेरीस टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे, अशा परिस्थितीत निवड समिती अशा खेळाडूंना संधी देत​आहे जे संघात सहभागी होणार आहेत. मात्र संघात अनुभवी खेळाडूकडे दुर्लक्ष केले जात आहे. (Sunil Gavaskar Make Statement On Shikhar Dhawan Place In Team India For T20 WC)

सिलेक्टर्स या खेळाडूकडे दुर्लक्ष करतायेत

अलीकडेच दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हार्दिक पांड्यासारख्या (Hardik Pandya) वरिष्ठ खेळाडूंनी टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे, परंतु आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा सलामीवीर शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) दुर्लक्ष केले जात आहे. धवन 36 वर्षांचा असून त्याने शेवटचा टी-20 सामना गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संघात संधी मिळालेली नाही.

T20 विश्वचषक खेळणे कठीण

2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण दिसत आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) मालिका आणि आयर्लंड मालिकेसाठी शिखरची भारतीय संघात निवड झालेली नाही. भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनीही धवन यापुढे राष्ट्रीय संघात पुनरागमन करु शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सुनील गावसकर माध्यमाशी बोलताना म्हणाले, ''नाही, शिखर धवनचे नाव मला दिसत नाही. त्याला पुनरागमन करायचे असते तर तो या संघात असता. बरेच लोक इंग्लंडला गेले आहेत आणि तो या संघात असू शकतो. जर तो या संघात नसेल तर तो टी-20 विश्वचषकासाठी पुनरागमन करताना मला दिसत नाही.''

कामगिरी भारतासाठी चांगली होती

शिखर धवनने टीम इंडियासाठी सर्व तीन स्वरूप खेळले आहेत. त्याने टीम इंडियासाठी 68 टी -20 सामने खेळले आहेत, ज्यात शिखर धवनने सरासरी 27.92 आणि 126.36 च्या स्ट्राइक रेटवर 1759 धावा केल्या आहेत. शिखर धवनने टी -20 क्रिकेटमध्ये 11 अर्धशतकांची नोंद केली आहे. त्याच वेळी, त्याने 7 आयपीएल हंगामात 400 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT