Team India: मोहम्मद शमी नसता तर...

भारताचे दोन मोठे खेळाडू एकमेकांशी भिडले होते.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये भांडणे होतातच. कधी कधी खेळाडु उत्कटतेच्या भरात परस्थीती विसरुन जाऊन भांडण करताना आपल्याला अनेकदा दिसून येतात. मात्र, सामन्यादरम्यान संघातील खेळाडू एकमेकांशी भिडल्याचे क्वचितच पाहायला मिळते. विशेषत: भारतीय संघात अशा घटना फार कमी घडल्या घडतात.

Team India
आयएसएल स्पर्धेत स्वयंगोलमुळे एटीके मोहन बागानचे नुकसान

टीम इंडिया (Team India) एक युनिट म्हणून मैदानात उतरते, पण आज आम्ही तुम्हाला एका घटनेबद्दल सांगणार आहोत जेव्हा भारताचे दोन मोठे खेळाडू एकमेकांशी भिडले होते. सामन्याच्या निर्णायक वळणावर संघातील खेळाडू एकमेकांशी गोंधळ घालताना दिसले, हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) होते, जे 2018 मध्ये पर्थ कसोटीदरम्यान एकमेकांवर चिडले. दोघांमधील संभाषण इतके टोकाचे होते की इतर खेळाडूंना त्यात हस्तक्षेप करावा लागला होता.

इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ऑस्ट्रेलियन ( Australia) चॅनलने दोघांमधील संभाषणाचा ऑडिओही प्रसिद्ध केला आहे. ऑडिओ ऐकून हे स्पष्ट झाले की इशांत आणि जडेजा एकमेकांवर खूप नाराज आहेत. इशांत शर्माने तर रवींद्र जडेजाला शिवीगाळ केली होता. दोन्ही खेळाडू सतत एकमेकांवर ओरडत होते. त्यात इतर खेळाडूंनी हस्तक्षेप केला, अन्यथा परिस्थिती बिघडत चालली होती.

Team India
Women Ashes: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने अ‍ॅशेसवर केला कब्जा, इंग्लंडने गमावली मालिका

2018 मध्ये, पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी मोहम्मद शमीचा एक चेंडू नॅथन लियॉनच्या हेल्मेटला लागला होता, त्यानंतर खेळ काही काळ थांबवला गेला. खेळ थांबवण्यात आला तेव्हा रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा यांच्यात वादावादी झाली. सुरुवातीला हे प्रकरण काय आहे हे लोकांना कळले नाही पण जेव्हा ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टरने दोघांमधील संभाषणाचा ऑडिओ जारी केला तेव्हा सर्व परिस्थिती स्पष्ट झाली. इशांत आणि जडेजा आपापसात भांडत होते. ही लढत कोणत्या मुद्द्यावर झाली हे कळू शकले नाही, मात्र दोघांचा ऑडिओ जगासमोर आला आहे.

स्टंपच्या माईकमध्ये कैद झालेल्या आवाजावरून इशांत जडेजाला हिंदीत म्हणाला, हात दाखवून माझ्याशी बोलू नकोस. काही असेल तर माझ्याकडे येऊन सांग. यानंतर जडेजा म्हणाला, तुम्ही इतके का बोलत आहात? इशांत म्हणाला, माझ्याकडे बोटे दाखवू नकोस. यानंतर इशांतने जडेजाबद्दल अपशब्द वापरले. यानंतर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी मध्यस्थी करत दोन्ही खेळाडूंना भांडण्यापासून रोखले.

Team India
Ranji Trophy चा नवा हंगाम 10 फेब्रुवारीपासून होणार सुरु

भारतीय संघ हा सामना हरला तर या मुद्द्यावर आणखी चर्चा सुरू झाली. मात्र, दोन्ही खेळाडूंमध्ये किरकोळ संभाषण झाले असून, भांडण झाल्यासारखे काही झाले नसल्याची माहिती परत बीसीसीआयने दिली. बरं, प्रत्येकजण ही लढत विसरला कारण टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली आणि संपूर्ण टीम इंडिया आणि भारतीय चाहते या कटू घटनेला जल्लोषात विसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com