Team India Schedule 2022: इंग्लंड ऑस्ट्रेलियातील खडतर स्पर्धा, T20 World Cup धोक्यात

टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली होती परंतु तिथेही फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला.
Team India

Team India

Dainik Gomantak

Published on
Updated on

टीम इंडियाने 2021 मध्ये उत्तम कामगिरी केली परंतु पुन्हा एकदा ती आयसीसी ट्रॉफी जिंकू शकली नाही. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली होती परंतु तिथेही फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. टी-20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडिया बाद फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र, भारतीय संघाने (Team India) इंग्लंड (England) दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी करत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. आता 2021 वर्ष संपलं अन् नवीन वर्ष 2022 दोन दिवसावर येऊन ठेपलं आहे. या वर्षीही टीम इंडियाला आपल्या उत्तम कामगिरीचा जलवा पुन्हा एकदा दाखवायचा आहे. तसेच त्यांच्यासमोर या वर्षात अनेक मोठी आव्हानेही असणार आहेत. चला तर मग टीम इंडियाचे 2022 चे टाईमटेबल जाणून घेऊया...

दरम्यान, भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा जानेवारीत असणार आहे. टीम इंडिया 2022 चा पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दुसरी कसोटी जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे. यानंतर 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये तिसरी कसोटी सुरु होईल. कसोटी मालिकेनंतर 19 जानेवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.

Team India

Ind Vs Sa Test: सेंच्युरियनच्या मैदानावर टीम इंडिया रचणार इतिहास

तसेच, फेब्रुवारीमध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 9 फेब्रुवारीला जयपूर आणि तिसरा एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारीला कोलकाता येथे खेळवला जाईल. यानंतर, तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 15 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळवला जाईल. दुसरा T20 18 फेब्रुवारीला विशाखापट्टणममध्ये, तिसरा T20 20 फेब्रुवारीला त्रिवेंद्रममध्ये खेळवला जाईल.

शिवाय, श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका फेब्रुवारीच्या अखेरीस सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना 25 फेब्रुवारीला बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 5 मार्चपासून मोहालीत सुरु होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. पहिला T20 13 मार्च रोजी मोहालीत खेळवण्यात येईल. दुसरा T20 15 मार्च रोजी धर्मशाला येथे, तिसरा T20 18 मार्च रोजी लखनौ येथे होणार आहे.

आयपीएल 2022 एप्रिल-मेमध्ये खेळवला जाईल, ज्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु जूनमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला T20 चेन्नईत 9 जूनला, दुसरा T20 12 जूनला बेंगळुरमध्ये, तिसरा T20 14 जूनला नागपुरात होणार आहे. चौथा T20 17 जून रोजी राजकोटमध्ये आणि पाचवा T20 19 जून रोजी दिल्लीत खेळवला जाईल.

Team India

IND vs SA: विराट सेना दक्षिण आफ्रिकेत रचणार इतिहास; माजी प्रशिक्षकांचा दावा

टीम इंडिया जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 1 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे गेल्या वर्षातील शेवटची उर्वरित कसोटी खेळणार आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने पुढे असून इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची संधी त्यांना असेल. याशिवाय टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. पहिला T20 7 जुलै रोजी साउदम्प्टन येथे, दुसरा T20 9 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे आणि तिसरा T20 नॉटिंगहॅम येथे 10 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 12 आणि 14 जुलै रोजी लंडनमध्ये एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने होणार आहेत. तिसरा वनडे 17 जुलै रोजी मँचेस्टर येथे होणार आहे.

टीम इंडियाचा सामना जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजशी होणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून तिथे तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत. या दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. सप्टेंबरमध्ये भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत भाग घेणार आहे, त्यामुळे त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

Team India

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया मांगे मोर!

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी त्यांच्याच घरच्या मैदानावर होणार आहे. या दौऱ्यात 4 कसोटी, 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे.

ऑस्ट्रेलियन भूमीवर 2022 टी-20 विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. टीम इंडियाला 2022 ची एकमेव ICC टूर्नामेंट जिंकायला नक्कीच आवडेल.

वर्षाचा शेवट बांगलादेश दौऱ्याने होईल ज्यामध्ये टीम इंडिया 2 कसोटी आणि 3 वनडे खेळणार आहे. ज्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com