Sunil Gavaskar | Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: 'संघ आवडला नाही, तर सामने पाहू नका...' गावसकरांनी टीकाकारांना सुनावले खडेबोल

Pranali Kodre

Sunil Gavaskar Loses Cool on Criticisms About India Squad for Asia Cup 2023: आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समीतीने सोमवारी (21 ऑगस्ट) 17 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. ३० ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा खेळली जाणार आहे.

अजित अगरकरच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या भारतीय संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर भारताच्या वनडे संघात पहिल्यांदाच तिलक वर्मालाही संधी मिळाली आहे.

मात्र, युजवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या खेळाडूंची निवड न झाल्याने बरीच टीका भारताच्या निवड समितीवर झाली आहे. पण आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी टीकाकारांना खडेबोल सुनावले असून संघाला पाठिंबा देण्याचा सल्ला दिला आहे.

गावसकरांनी आज तकशी बोलताना म्हटले की 'हो, असे काही खेळाडू असतील, ज्यांना अनलकी वाटेल. पण आता संघ निवडला गेला आहे. त्यामुळे जे संघात नाहीत, त्यांच्याबद्दल बोलणे बंद करा. त्यापेक्षा जो संघ निवडला गेला आहे, त्याला पाठिंबा देणे चांगले असेल. हा किंवा त्या खेळाडूला का निवडले गेले नाही, यावर चर्चा करणे, ही योग्य मानसिकता नाही. वाद निर्माण करू नका.'

'जर तुम्हाला संघ आवडला नाही, तर सामने पाहू नका. संघनिवडीवर प्रतिक्रिया देणे थांबवा. हा भारताचा संघ आहे आणि आपण त्यांना पाठिंबा द्यायलाच पाहिजे.'

याशिवाय गावसकरांनी चहलपेक्षा कुलदीप यादवला पहिली पसंती देण्याबद्दलही मत मांडले.

गावसकर म्हणाले, 'कधीकधी तुम्ही संघाच्या समतोलतेकडे लक्ष देता. कदाचीत, तुम्ही असे म्हणू शकता की कुलदीप खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करू शकतो. त्याचमुळे कदाचीत त्याला चहलच्या आधी पसंती दिली असावी. त्याचबरोबर तो डाव्या हाताची विवधताही त्याच्याबरोबर आणतो.'

याशिवाय गावसकर यांनी श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला दुखापतीतून सावरल्यानंतर थेट आशिया चषकात संधी देण्याच्या निर्णयालाही पाठिंबा दिला आहे. आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने त्यांना संधी देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

त्याचबरोबर गावसकर असेही म्हटले की हा चांगला संघ आहे. त्यांनी म्हटले की 'आशिया चषकासाठी निवडलेला संघ चांगला आहे. या संघातून आपला वर्ल्डकपसाठी १५ जणांचाच संघ असणार आहे. जेव्हा तुम्ही भारतासाठी सामना खेळता, तेव्हा प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. तुम्ही नेहमीच प्रत्येक सामना जिंकण्याचाच प्रयत्न करायला हवा.'

'आशिया चषक मोठी स्पर्धा आहे. पण वर्ल्डकप जिंकणे वेगळी गोष्ट आहे. आशिया चषक विजयाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. जर ते आशिया चषक जिंकले, तर चांगलेच आहे, पण वर्ल्डकप जिंकणे हे ध्येय असले पाहिजे.'

  • आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

    राखीव खेळाडू - संजू सॅमसन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT