England Cricket Team | Sunil Gavaskar X
क्रीडा

IND vs ENG: तुमच्या 'बझबॉल'ला तोडगा आमचा 'विराटबॉल', गावसकरांनी इंग्लंडला चेतावलं

Sunil Gavaskar: कसोटीत इंग्लंडच्या आक्रमक दृष्टीकोनाबद्दल सुनील गावसकरांनी प्रतिक्रिया दिली असून भारताविरुद्ध ते कसे खेळतात हे पाहाणे औत्सुक्याचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Pranali Kodre

Sunil Gavaskar feels India have Virat Kohli as counter for England Bazball:

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, दोन बलाढ्य संघात ही मालिका होणार असल्याने त्याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.

दोन्ही देशातील आजी-माजी खेळाडूंनी या मालिकांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यात आता भारताने दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यांनी म्हटले आहे की इंग्लंडच्या बझबॉलसाठी भारताकडे विराटबॉल हा तोडगा आहे.

खरतंर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमचे टोपननाव बझ आहे आणि सध्या तो इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक आहे. दरम्यान तो प्रशिक्षक झाल्यानंतर इंग्लंडने बऱ्याचदा कसोटीत आक्रमक फलंदाजीचा पवित्रा स्विकारला आहे.

त्याचमुळे या पद्धतीने खेळण्याला बझबॉल म्हणून ओळख मिळाली आहे. भारताविरुद्धही इंग्लंड बझबॉल रणनीती वापरणार की नाही, याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

याबद्दल आता गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, 'विराटने कसोटी क्रिकेटमध्ये सारख्याच संख्येत शतके आणि अर्धशतके केली आहेत. त्याचा अर्थ त्याचा अर्धशतकाचे शतकात रुपांतर करण्याचा दर चांगला आहे. तो ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ते पाहाता त्याचा हालचाली चांगल्या भासत आहत. तो ज्या फॉर्ममध्ये आहे, जे पाहाता बझबॉलचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे विराटबॉल आहे.'

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 113 कसोटी सामने खेळताना 29 शतके आणि 30 अर्धशतकांसह 8848 धावा केल्या आहेत.

दरम्यान, गावसकर यांनी असेही पुढे म्हटले की बझबॉल पद्धत भारतात फिरकीपटूंसमोर किती प्रभावी ठरणार हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गावसकर म्हणाले, 'यामध्ये फलंदाज आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करतात. कोणतीही परिस्थिती असो ते फक्त आक्रमक खेळतात. पण हे पाहाणे औत्सक्याचे ठरणार आहे की हा आक्रमक दृष्टीकोन भारताच्या फिरकीपटूंविरुद्ध प्रभावी ठरणार की नाही.'

दरम्यान, यापूर्वी जेव्हा अखेरीस भारत आणि इंग्लंड आमने-सामने होते, तेव्हा 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. तसेच इंग्लंडने भारतात अखेरीस 2012 साली कसोटी मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे त्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाने मायदेशात गेल्या 12 वर्षात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

भारत विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिकेचे वेळापत्रक

25 ते 29 जानेवारी - पहिली कसोटी, मोहाली (वेळ: स. 9.30 वाजता)

2 ते 6 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, विशाखापट्टणम (वेळ: स. 9.30 वाजता)

15 ते 19 फेब्रुवारी - तिसरी कसोटी, राजकोट (वेळ: स. 9.30 वाजता)

23 ते 27 फेब्रुवारी - चौथी कसोटी, रांची (वेळ: स. 9.30 वाजता)

7 ते 11 मार्च - पाचवी कसोटी, धरमशाला (वेळ: स. 9.30 वाजता)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT