IND vs ENG: 'विराटमध्ये इगो, विशेषत: भारतात...', कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडच्या रॉबिन्सनने फुंकले रणशिंग

Ollie Robinson: भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी रॉबिन्सन शमी आणि इशांतची गोलंदाजी पाहून तयारी करत असल्याचे त्याने सांगितले.
Ollie Robinson - Virat Kohli
Ollie Robinson - Virat KohliX/ICC
Published on
Updated on

England Bowler Ollie Robinson opened up on facing Virat Kohli ahead of India vs England Test Series:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड आणि भारताच्या आजी-माजी खेळाडूंकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सननेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने विराट कोहलीबरोबर होणाऱ्या स्पर्धेबाबतही मत व्यक्त केले आहे.

रॉबिन्सनन या मालिकेत जेम्स अँडरसनबरोबर इंग्लंडची वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळू शकतो. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे काही काळ खेळता आले नव्हते. तसेच स्टुअर्ट ब्रॉडही आता निवृत्त झाल्याने त्याला पसंती दिली जाऊ शकते.

दरम्यान, या मालिकेत खेळण्यापूर्वी त्याने २०२१ मधील मालिकेवेळी विराट आणि त्याच्यात चूरशीची प्रतिस्पर्धा पाहायला मिळाली होती. त्यावेळी विराटला त्याने तीनवेळा बाद केले होते. तर विराटनेही त्याला सतवले होते.

Ollie Robinson - Virat Kohli
IND vs ENG: टीम इंडियाला मायदेशात रोखण्यासाठी इंग्लंड वापरणार 'ही' रणनीती, अँडरसनने दिले संकेत

याबाबत ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रॉबिन्सन म्हणाला, 'काहीदिवसांपूर्वीच मी एक व्हिडिओ पाहिला. ज्याच मी लॉर्ड्सवर फलंदाजी करण्यासाठी बाहेर जात होतो, मला वाटते मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता.

'त्याने पुढचा चेंडू माझ्या छातीवर टाकला. त्यानंतर सर्व भारतीय खेळाडू माझ्या भोवती जमा झाले होते. त्यावेळी विराट काहीतरी बोलत होता, मला लक्षात नाही की त्याने काय म्हटले होते.'

रॉबिन्सन पुढे म्हणाला, 'तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्याची इच्छा असते, हो ना? तुम्ही नेहमीत सर्वोत्तम खेळाडूला बाद करू इच्छिता. कोहली त्यापैकी एक आहे. त्याच्यात अहंकार आहे, विशेषत: भारतात, जिथे तो धावा करून वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितो. त्यामुळे आमच्यात यापूर्वी स्पर्धा झालेली, हे लक्षात घेता हे उत्साहित करण्यासारखे आहे.'

याशिवाय रॉबिन्सन म्हणाला, तो मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या गोलंदाजीतील बारकावे शिकत आहे. त्याने सांगितले 'मी खरंतर मोहम्मद शमीप्रमाणे डेड-स्ट्रेट सीम गोलंदाजी टाकण्याचा सराव करत आहे. मी इशांत शर्मालाही पाहत आहे. तो काही काळ ससेक्ससाठी खेळला आहे. त्याने भारतात बराच काळ चांगली कामगिरी केली. तो देखील माझ्याप्रमाणे उंच आहे.'

Ollie Robinson - Virat Kohli
IND vs AFG, Video: जर विराट नसता, तर कदाचीत सुपर ओव्हर झालीच नसती, पाहा किंग कोहलीची अफलातून फिल्डिंग

तसेच रॉबिन्सनने असेही सांगितले की तो या आव्हानासाठी सज्ज असून तो इंग्लंडसाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.

दरम्यान, 2012 नंतर भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका पराभूत झालेला नाही. यापूर्वी 2012 मध्ये अखेरचे इंग्लंडनेच भारताला कसोटी मालिकेत पराभूत केले होते.

त्यामुळे 12 वर्षांनंतर पुन्हा याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या हेतूने इंग्लंड मैदानात उतरणार आहेत, तर भारतीय संघ 12 वर्षांची अपराजीत राहण्याची मालिका कायम राखण्यासाठी खेळणार आहेत. ही मालिका कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचाही भाग आहे.

असे आहेत संघ -

  • भारत (पहिल्या दोन सामन्यांसाठी) - रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

  • इंग्लंड - हॅरी ब्रुक, झॅक क्रावली, बेन डकेट, जो रुट, बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन फोक्स, ऑली पोप, जेम्स अँडरसन, गट अटकिन्सन, शोएब बाशिर, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com