Dabolim Airport: "ती गोपनीय माहिती जाहीर करा!" फर्नांडिस यांना आमदार साळकरांचं चॅलेंज; दाबोळी विमानतळावरुन साधला निशाणा VIDEO

South Goa MP Viriato Fernandes vs Krishna Salkar: गोव्याच्या प्रगतीचा आणि विमानतळांच्या भविष्याचा विचार करता आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी एक महत्त्वाचे विधान केले.
South Goa MP Viriato Fernandes vs Krishna Salkar
South Goa MP Viriato Fernandes vs Krishna SalkarDainik Gomantak
Published on
Updated on

Fernandes vs Salgaonkar: गोव्याच्या प्रगतीचा आणि विमानतळांच्या भविष्याचा विचार करता आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी एक महत्त्वाचे विधान केले. गोव्याची सध्याची प्रगती आणि पर्यटनाचा वाढता ओघ पाहता, भविष्यात गोव्याला तिसऱ्या विमानतळाचीही गरज भासू शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांच्यावर टीका केली असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण न करण्याचे आवाहन केले.

आमदार साळकर यांच्या मते, गोवा (Goa) हे जागतिक पर्यटनाचे केंद्र बनत आहे. ज्या वेगाने राज्याचा विकास होत आहे, त्याकडे पाहिल्यास भविष्यात केवळ दोन विमानतळे (दाबोळी आणि मोपा) राज्याची गरज पूर्ण करण्यासाठी अपुरी ठरु शकतात. पर्यटनाच्या अफाट संधी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात तिसऱ्या विमानतळाचा विचार करावा लागणे हे गोव्याच्या समृद्धीचे लक्षण असेल.

South Goa MP Viriato Fernandes vs Krishna Salkar
Dabolim Airport: मंत्री गुदिन्‍होंनी 'दाबोळी'बाबत राजनाथ सिंगांना का पत्र लिहिले? सरदेसाईंकडून सरकारवर हल्लाबोल

यावेळी त्यांनी दाबोळी विमानतळाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. खासदार विरियातो फर्नांडिस यांनी दाबोळी विमानतळाबाबत आपल्याला काही 'गोपनीय माहिती' मिळाल्याचा दावा केला होता. त्यावर साळकर म्हणाले की, खासदारांनी अशी कोणतीही गुप्त माहिती स्वतःकडे न ठेवता ती जनतेसमोर जाहीर करावी. केवळ अफवा पसरवून लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आधीच विधानसभेच्या पटलावर दाबोळी विमानतळ सुरुच राहील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सरकारी आश्वासनानंतरही शंका उपस्थित करणे अनाठायी आहे.

South Goa MP Viriato Fernandes vs Krishna Salkar
Dabolim Airport: लवकरच येणार दाबोळी विमानतळ बंदचा आदेश? खासदार फर्नांडिस यांनी उघड केलं गुपित; 'ती' गुप्त फाईल रोखण्याची केली मागणी VIDEO

राज्याच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत हवाई कनेक्टिव्हिटीचा वाटा मोठा आहे. मोपा विमानतळ सुरु झाल्यापासून उत्तर गोव्यात पर्यटनाला गती मिळाली असली, तरी दक्षिण गोव्याचे (South Goa) महत्त्व कमी होणार नाही. उलट, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही विमानतळे पूर्ण क्षमतेने चालवणे गरजेचे आहे. भविष्यात तिसऱ्या विमानतळाची गरज पडेल इतका गोव्याचा विकास व्हावा, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com