IND vs ENG: भारत दौऱ्यातून अचानक मायदेशी परतला इंग्लंडचा धाकड फलंदाज, बदली खेळाडूचीही घोषणा

Harry Brook: इंग्लंडचा प्रमुख फलंदाजाने आगामी भारत दौऱ्यातून माघार घेतल्याने बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.
England Team
England TeamDainik Gomantak
Published on
Updated on

England Cricket Team Tour of India 2024, Test Series:

इंग्लंड क्रिकेट संघ रविवारी भारत दौऱ्यावर येणार होता. भारत आणि इंग्लंड संघात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादला होणार आहे. मात्र, या मालिकेल सुरुवात होण्यापूर्वीच इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुक मायदेशी परतला आहे.

इंग्लंड संघ अबुधाबीमध्ये या दौऱ्यासाठी गेले काही दिवस तयारी करत होते. त्यानंतर रविवारी हैदराबादमध्ये संघ येणार होता. मात्र, वैयक्तिक कारणामुळे ब्रुक संघासह भारतात न येता दुबईतूनच मायदेशी परतल्याचे इंग्लंड क्रिकेटने सांगितले आहे. तो आता भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही.

England Team
IND vs ENG: 'विराटमध्ये इगो, विशेषत: भारतात...', कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडच्या रॉबिन्सनने फुंकले रणशिंग

दरम्यान, त्याने या दौऱ्यातून माघार घेण्याचे कारण वैयक्तिक असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पष्ट केले असून या कालावधीत त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर करण्याच सर्वांना विनंतीही केली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की 'ब्रुक कुटुंबियांनी या काळात त्यांच्या खाजगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे. ते पाहाता ईसीबी आणि कुटुंबाकडून आम्ही मीडिया आणि लोकांना विनंती करतो त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा आदर केला जावा आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू नये.'

बदली खेळाडूची निवड

दरम्यान, ब्रुक पुन्हा मायदेशी परतल्याने इंग्लंड क्रिकेटने डॅन लॉरेन्सची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. तो पुढील 24 तासात भारतात येणार असल्याचे इंग्लंडने सांगितले आहे.

England Team
Ind vs Eng: जो रुटच्या निशाण्यावर मास्टर ब्लास्टरचा रेकॉर्ड; पहिल्याच कसोटीत सामन्यात...

भारतासमोर इंग्लंडचे आव्हान

दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघात होत असलेली कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग आहे.

दरम्यान, भारतीय संघ गेली 12 वर्षे मायदेशात कसोटी मालिका पराभूत झालेले नाही. त्यांना अखेरीस कसोटी मालिकेत इंग्लंडनेच पराभूत केले होते.

त्यामुळे 12 वर्षांपूर्वीच्या मालिका विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी इंग्लंडचा संघ उत्सुक आहे, तर भारतीय संघही 12 वर्षांची अपराजीत राहण्याची मालिका कायम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

भारत विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • 25 ते 29 जानेवारी - पहिली कसोटी, मोहाली (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 2 ते 6 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, विशाखापट्टणम (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 15 ते 19 फेब्रुवारी - तिसरी कसोटी, राजकोट (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 23 ते 27 फेब्रुवारी - चौथी कसोटी, रांची (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 7 ते 11 मार्च - पाचवी कसोटी, धरमशाला (वेळ: स. 9.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com