South Africa vs India BCCI
क्रीडा

SA vs IND: पहिल्या मॅचसारखाच दुसऱ्या T20 मध्येही पाऊस बनणार अडथळा? पाहा काय आहेत हवामान अंदाज

India vs South Africa: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवारी दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd T20I Match at Gqeberha, Weather Update:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिकेला 10 डिसेंबर रोजी सुरुवात झाली. या मालिकेतील दुसरा सामना गेकेबेरा (पूर्वीचे नाव पोर्ट एलिझाबेथ) येथे खेळवला जाणार आहे. हा सामना मंगळवारी (12 डिसेंबर) होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होणार आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात होत असलेल्या टी20 मालिकेतील पहिला सामना डर्बनला 10 डिसेंबरला होणार होता, पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातही पाऊस अडथळा बनणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मंगळवारी गेकेबेरामध्येही ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच पाऊसही असणार आहे. Accuweather च्या अंदाजानुसार मंगळवारी गेकेबेरामधील हवामान पूर्ण ढगाळ असेल, त्याचबरोबर दिवसा 80 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

मात्र, रात्री पावसाची शक्यता 6 टक्केच आहे. त्यामुळे दुसरा टी20 सामना खेळवला जाऊ शकतो. पण तरी दिवसा पाऊस झाला असल्याने कदाचीत मैदान ओले होऊ शकते आणि त्याचमुळे सामन्याला उशीर होऊ शकतो. किंवा सामन्यादरम्यानही पावसामुळे काहीसा अडथळा निर्माण होऊ शकतो.

लाईव्ह स्ट्रिमिंग

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर, तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार आहे.

युवा भारतीय संघ

टी20 मालिकेसाठी भारताच्या संघात अनेक युवा खेळाडू आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारख्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

तसेच हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमीही दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच उपकर्णधारपद रविंद्र जडेजा सांभाळत आहे.

असे आहेत संघ -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

  • दक्षिण आफ्रिका - एडन मार्करम (कर्णधार), ओटनियल बार्टमन, मॅथ्यू ब्रिट्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी (पहिला आणि दुसरा टी20), डोनोव्हन फरेरा, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को यान्सिन (पहिला आणि दुसरा टी20), हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी (पहिला आणि दुसरा टी20), अँडिले फेहलुकवायो, ताब्राईज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझार्ड विल्यम्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT