SA vs IND: द. आफ्रिकेत पोहचताच टीम इंडियाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत! BCCI ने शेअर केला स्पेशल व्हिडिओ

India tour of South Africa: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला पोहचला असून आता येथे पुढील एक महिन्यात तिन्ही प्रकारच्या मालिका खेळणार आहे.
Team India
Team IndiaBCCI
Published on
Updated on

Team India Reached at Durban, South Africa:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. 10 डिसेंबरपासून या दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघातील खेळाडू डर्बनला पोहचले आहेत.

या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात  3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत. तसेच याचवेळी भारतीय अ संघाचाही दक्षिण आफ्रिका दौरा होत आहे. भारतीय अ संघ 3 प्रथम श्रेणी सामने या दौऱ्यात खेळणार आहेत.

या दौऱ्यासाठी भारतीय संघ भारतातून निघाल्यानंतर डर्बनमध्ये पोहचेपर्यंतचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये खेळाडू भारतातून एकत्र निघालेले दिसत आहेत. तसेच नंतर डर्बनला पोहचल्यानंतर त्यांचे हॉटेलमध्ये जोरदार स्वागत झाले. हॉटेलमधील स्टाफने जेव्हा भारतीय संघातील खेळाडू पोहचले, तेव्हा टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. दरम्यान, भारतीय संघ डर्बनला पोहचल्यानंतर पाऊस पडत असल्याचेही व्हिडिओतून दिसले.

असा आहे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

भारतीय संघ 10 ते 14 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर 17 ते 21 डिसेंबर दरम्यान वनडे मालिका होणार आहे. तसेच 26 ते 30 डिसेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना सेंच्युरियनला होणार आहे. तर 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान दुसरा कसोटी सामना केपटाऊनला होणार आहे.

या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व तीन वेगवेगळे खेळाडू करणार आहेत. टी20 आणि वनडे मालिकांसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विश्रांतीची विनंती केली होती. ही विनंती बीसीसीआयने मान्य केली. त्याचबरोबर हार्दिक पंड्या घोट्याला झालेल्या दुखापतीतून सावरत आहे.

त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडेमध्ये केएल राहुल, तर टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच कसोटी मालिकेसाठी मात्र विराट आणि रोहित दोघेही उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे रोहित कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

Team India
IND vs AUS: 'अंपायरने त्यांचं काम केलं...', शेवटच्या ओव्हरमधील नाट्यमय घटनांनंतर हेडनचा पक्षपाताचा आरोप

असे आहेत भारतीय संघ

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

टी20 मालिका

  • 10 डिसेंबर - पहिला टी20 सामना, डर्बन (वेळ- संध्या. 7.30 वाजता)

  • 12 डिसेंबर - दुसरा टी20 सामना, पोर्ट एलिझाबेथ (वेळ- रात्री 8.30 वाजता)

  • 14 डिसेंबर - तिसरा टी20 सामना, जोहान्सबर्ग (वेळ- रात्री 8.30 वाजता)

वनडे मालिका

  • 17 डिसेंबर - पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग (वेळ - दुपारी 1.30 वाजता)

  • 19 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, पोर्ट एलिझाबेथ (वेळ - दुपारी 4.30 वाजता)

  • 21 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, पार्ल(वेळ - दुपारी 4.30 वाजता)

कसोटी मालिका

  • 26 ते 30 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन (वेळ - दुपारी 1.30 वाजता)

  • 3 ते 7 जानेवारी - दुसरी कसोटी सामना, जोहान्सबर्ग (वेळ - दुपारी 2.00 वाजता)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com