SA Vs IND: पावसानं घातला घोळ! भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द

South Africa vs India 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
South Africa vs India 1st T20
South Africa vs India 1st T20Dainik Gomantak
Published on
Updated on

South Africa vs India 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही. हा सामना डर्बनमध्ये खेळवला जाणार होता. आता मालिकेतील दुसरा सामना 12 डिसेंबर रोजी ओव्हरल मैदानावर होणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. टी-20 मालिकेसाठी युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली जात आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियासाठी परदेशी भूमीवर टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या युवा खेळाडूंची टेस्ट घेण्याची ही चांगली संधी आहे.

दरम्यान, T20 विश्वचषक 2024 यावेळी परदेशी भूमीवर खेळवला जाईल. या विश्वचषकापूर्वी भारताला फक्त 5 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. यापैकी टीम इंडिया अफगाणिस्तानसोबत मायदेशात तीन सामने खेळणार आहे. अफगाणिस्तानचा संघ जानेवारी 2024 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. जिथे उभय संघांमध्ये तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे.

South Africa vs India 1st T20
IND Vs SA: डर्बनमध्ये रंगणार पहिला T20 सामना; जाणून घ्या या मैदानावरील भारताचा रेकॉर्ड!

दुसरीकडे, बीसीसीआयलाही टी-20 विश्वचषकापूर्वी धाकड टीम इंडिया तयार करायची आहे. कारण गेल्या एक वर्षापासून रोहित शर्मापासून विराट कोहली आणि केएल राहुलपर्यंत संघातील वरिष्ठ खेळाडूंनी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली 2024 च्या T20 विश्वचषकात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

South Africa vs India 1st T20
IND Vs SA: कसोटीत आफ्रिकेचा रेकॉर्ड 'खतरनाक'; अझहरपासून कोहलीपर्यंत सर्व कर्णधार ठरले अपयशी

भारतीय युवा खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत

दरम्यान, टीम इंडियातील युवा खेळाडू सध्या शानदार फॉर्ममध्ये दिसत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियासोबत खेळलेल्या टी-20 मालिकेत युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रभावित केले. विशेषतः फलंदाजीत भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली. आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव फलंदाजीपासून कर्णधारपदापर्यंत कमाल करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com