Umpire Marais Erasmus | South Africa vs England Dainik Gomantak
क्रीडा

SA vs ENG: इकडे बॅट्समन शॉट मारतोय अन् तिकडे पंच आपल्याच धूंदीत, Video एकदा पाहाच

दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड सामन्यादरम्यान एका चेंडूवेळी अंपायरचे दुर्लक्ष झाल्याचे दिसले, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

South Africa vs England: शुक्रवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात ब्लोमफॉन्टेन येथे वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 27 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यातील पंच मारेस इरास्मस यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड धूमाकुळ घालत आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय 97 धावांवर खेळत होता. त्याचदरम्यान तो एका चेंडूचा सामना करत असताना इरास्मस यांचे लक्ष विचलित झाल्याचे दिसले. ते चेंडूकडे न पाहाता दुसरीकडेच पाहात होते.

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून काही चाहत्यांनी मजेत ते आपल्याच धूंदीत असल्याचे म्हटले, तर काही चाहत्यांनी त्यांना सामन्यात काहीच रस नसल्याचे म्हटले आहे.

(Umpire Marais Erasmus missed the entire delivery)

दरम्यान, या सामन्यात 299 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून रॉय आणि डेव्हिड मलान यांनी चांगली सुरुवात दिली होती. या दोघांनीही 146 धावांची सलामी भागीदारी रचली होती.

मात्र मलान 59 धावांवर बाद झाल्यावर इंग्लंडने पुढच्या 125 धावांत सर्व 10 विकेट्स गमावल्या. त्यामुळे इंग्लंडचा डाव 44.2 षटकात 271 धावांवर संपुष्टात आला. पण यादरम्यान रॉयने शानदार फलंदाजी करताना 91 चेंडूत 113 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून एन्रिच नॉर्कियाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच सिसांडा मंगलाने 3 विकेट्स, कागिसो रबाडाने 2 विकेट्स आणि ताब्राईज शम्सीने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेकडून रस्सी वॅन डर ड्युसेनने 111 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच डेविड मिलरने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच क्विंटॉन डी कॉकने 37, तेंबा बाऊमाने 36 आणि हेन्रीक क्लासेनने 30 धावांची छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोफ्रा आर्चर, मोईन अली, आदील राशिद आणि ऑली स्टोन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT