Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

Tilak Varma: 'अन् अंगावर काटा आला...' तिलकला थेट दक्षिण आफ्रिकेतून मित्राचा स्पेशल व्हिडिओ मेसेज

Tilak Varma Video: वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून पदार्पणात शानदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्मासाठी दक्षिण आफ्रिकेतील मित्राने खास मेसेज पाठवला होता.

Pranali Kodre

Dewald Brevis special message for Tilak Varma: भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारी (3 ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण असे असले तरी या सामन्यात भारताचा 20 वर्षांचा क्रिकेटपटू तिलक वर्माने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले.

त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातून तिलकने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना खास ठरला. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच चांगली कामगिरीही केली.

या सामन्यानंतर त्याच्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा युवा प्रतिभावान खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने खास संदेश पाठवला आहे, या क्षणांचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे. तिलक आणि ब्रेविस आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळतात.

या सामन्यात तिलकने क्षेत्ररक्षण करताना जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांचे झेल घेतले. यातील चार्ल्सचा त्याने पळत येऊन सूर मारत घेतलेल्या झेलाने सर्वांना चकीत केले. तसेच त्याने शानदार क्षेत्ररक्षणानंतर ताबडतोड फलंदाजीही केली.

वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिलकने भारताकडून सर्वोच्च धावांची खेळी केली. तो भारताकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. फलंदाजीला आल्यानंतर लगेचच दुसऱ्या आणि तिसऱ्याच चेंडूवर त्याने सलग दोन षटकार मारले. त्याने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.

दरम्यान, तिलकच्या याच कामगिरीचे ब्रेविसने कौतुक केले असून त्याचे पदार्पणाबद्दल अभिनंदनही केले आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते, ब्रेविसने एका व्हिडिओतून तिलकला संदेश दिला असून तो व्हिडिओ तिलक पाहात आहे.

ब्रेविसने संदेश व्हिडिओमध्ये म्हटले आहे की 'भावा, आशा आहे तू मस्त असशील. मला माहित नाही की मी तुझ्यापेक्षा जास्त उत्साहात आहे, पण मला तुला इतकेच सांगायचे आहे की माझ्याकडून आणि माझ्या ब्रेविस कुटुंबाकडून तुझे पदार्पणासाठी अभिनंदन. तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी हा शानदार क्षण आहे.'

'मी कल्पना करू शकतो की तुझे पालक आणि सर्वजण किती खूश असतील. तुला तिथे तुझे स्वप्न जगताना पाहून आनंद वाटला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूने (दोन सलग षटकार) माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तुला माझा नेहमीच पाठिंबा असेल. उर्वरित मालिकेसाठी तुला शुभेच्छा. मी तुला पूर्ण पाठिंबा देत राहिल, भारतासाठी सामने जिंकून दे.'

या संदेशाबद्दल तिलक म्हणाला, 'मला खरंच हे आवडलं आहे. हे खूप छान सरप्राईज होते. मी विचार करत होतो की कदाचीत माझ्या प्रशिक्षकाचा किंवा कुटुंबाचा संदेश असेल. दुसरा पर्याय डेवाल्ड ब्रेविस होता, माझा भाऊ. त्यामुळे मी खूप खूश आहे. भावा खूप आभार. लवकरच भेटू.'

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 149 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताला 20 षटकात 9 बाद 149 धावाच करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'NATURE' म्हणजे 'नटूरे'... शिक्षकांचं इंग्लिश पाहून सगळेच हैराण, व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

India vs Pakistan: भारत- पाकिस्तान सामना थांबला, मैदानात नेमकं घडलं काय? पंचांनी 15 मिनिटं घेतली Watch Video

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

India vs Pakistan: इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकली! पाकिस्तानविरुद्ध 'स्मृती' ठरली फेल; अजून वाट पाहावी लागणार

Irani Cup 2025: महाराष्ट्राची गर्जना! पाटीदार, किशन, ऋतुराज... स्टार खेळाडूंसमोर 'विदर्भाचा' डंका, तिसऱ्यांदा इराणी कप जिंकला

SCROLL FOR NEXT