WI vs IND, 1st T20I: तिलक वर्माने पदार्पण गाजवलं! अफलातून कॅच घेतल्यानंतर धुंवाधार बॅटिंग, Video व्हायरल

Tilak Varma: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण करताना तिलक वर्माने बॅटिंग आणि फिल्डींगमध्ये शानदार कामगिरी बजावली.
Tilak Varma
Tilak VarmaDainik Gomantak
Published on
Updated on

A promising debut for Tilak Varma: भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारी (3 ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी हा सामना भारताचा युवा क्रिकेटपटू तिलक वर्मासाठी वैयक्तिकरित्या खास ठरला.

तिलकने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने या पदार्पणाच्या सामन्यात शानदार कामगिरीही केली. त्याने या सामन्यात ताबडतोड फलंदाजीबरोबरच, क्षेत्ररक्षणातही महत्त्वाचे योगदान दिले.

Tilak Varma
RCB ला मिळाला नवा कोच! 'या क्रिकेटरच्या खांद्यावर जबाबदारी, तर दोन दिग्गजांची सुटली साथ

तिलकचा भन्नाट झेल

या सामन्यात वेस्ट इंडिज संघ प्रथम फलंदाजी करत होता. यावेळी पहिले दोन विकेट्स गमावल्यानंतर जॉन्सन चार्ल आणि निकोलस पूरन डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. पण आठव्या षटकात कुलदीप यादवने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर चार्ल्सने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

पण, त्याने मारलेल्या शॉवर डीप मिड विकेटला उभा असलेल्या तिलकने डाव्या बाजूला पळत जात सूर मारत झेल घेतला. त्याने घेतलेला हा झेल पाहून भारतीय खेळाडूंसह समालोचकही चकीत झाले होते. त्याने झेल घेतल्याने चार्ल्सला 3 धावांवरच माघारी परतावे लागले.

तिलकने नंतर 15 व्या षटकात देखील हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर निकोलस पूरनचा 41 धावांवर झेल घेतला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 बाद 149 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोवमन पॉवेलने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली.

तसेच भारताकडून अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Tilak Varma
WI vs IND, 1st T20I: जेसन होल्डरनं भारतीय संघाला लावला 'होल्ड', एकाच षटकात पालटली बाजी

तिलकची धुंवाधार फलंदाजी

वेस्ट इंडिजने भारतासमोर 150 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर शुभमन गिल (3) आणि इशान किशन (6) यांच्या विकेट्स पहिल्या 5 षटकांच्या आतच गमावल्या होत्या.

पण नंतर सूर्यकुमार यादवबरोबर फलंदाजी करताना तिलकने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्याच चेंडूवर सलग दोन षटकार मारले.

त्याने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. म्हणजेच 26 धावा त्याने केवळ चौकार आणि षटकारातून वसूल केल्या.

त्याच्या या खेळीने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र तो ११ व्या षटकात रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर बाद झाला.

तसेच अन्य कोणालाही फार काही करता आले नाही. त्यामुळे भारताला 20 षटकात 9 बाद 149 धावाच करता आल्या.

वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅकॉय, जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अकिल होसेनने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com