WI vs IND 1st T20: त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा 4 धावांनी पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 गडी गमावून 149 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 145 धावाच करु शकला. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक 39 धावा केल्या.
दरम्यान, 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकातच संघाने शुभमन गिलची विकेट गमावली. संघ धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. यानंतर सूर्यकुमारने काही मोठे फटके मारले.
यातच, 5व्या षटकात इशान किशन (Ishan Kishan) झेलबाद झाला. इशानला 9 चेंडूत केवळ 6 धावा करता आल्या. यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी झाली. सूर्यकुमार 21 चेंडूत 21 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला असला तरी.
त्यानंतर काही वेळातच तिलक वर्मा वैयक्तिक 39 धावांवर बाद झाला. भारताकडून या सामन्यात तिलकने सर्वाधिक धावा केल्या.
त्यानंतर, हार्दिक आणि संजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही एकाच षटकात बाद झाले. हार्दिक 19 धावा केल्यानंतर क्लीन बोल्ड झाला, तर संजू 12 चेंडूत 12 धावा करुन धावबाद झाला.
यानंतर अक्षर पटेलने विजयाचा प्रयत्न केला पण तो ही 13 धावा करुन बाद झाला. अखेरच्या टप्प्यात आलेल्या अर्शदीपने 7 चेंडूत 12 धावा करुन विजयाच्या आशा उंचावल्या, पण संघाला 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
तसेच, भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 गडी गमावून 149 धावा केल्या.
वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर भारताकडून लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने 24 तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 31 धावांत प्रत्येकी 2 बळी घेतले.
डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि कर्णधार हार्दिक पांड्याने चार षटकात अनुक्रमे 20 आणि 27 धावा देत किफायतशीर गोलंदाजी केली.
दोघांनीही अनुक्रमे एक-एक विकेट घेतली. तर वेस्ट इंडिजकडून शेपर्ड, होल्डर आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली. पण यजुवेंद्र चहलने आपल्या पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजला दुहेरी झटका दिला. चहलने एकाच षटकात दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
काइल मेयर्सला 7 चेंडूत केवळ एकच धाव करता आली. तर ब्रेंडन किंग 19 चेंडूत 28 धावा करुन बाद झाला.
यानंतर निकोलस पूरनने येताच काही मोठे फटके मारले. जॉन्सन चार्ल्स 6 चेंडूत तीन धावा करुन बाद झाला. हार्दिकने त्याला झेलबाद केले. पूरन 34 चेंडूत 41 धावा करुन बाद झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.