सिध्दनाथ क्लब कॅरम स्पर्धा Dainik Gomantak
क्रीडा

सिध्दनाथ क्लबची कॅरम स्पर्धा उत्साहात

महेश कारोंडे, खुशी गोसावीला विजेतेपद

Dainik Gomantak

Carom: केळबाईवाडा-मये येथील श्री सिध्दनाथ क्रिडा व सांस्कृतिक क्लब (Siddhnath Sports and Cultural club) आयोजित पहिल्या अखिल गोवा कॅरम स्पर्धेत (Goa Carom Competition) पुरूष गटात महेश करोंडे यांनी तर महिला गटात खुशी गणपत गोसावी हिने विजेतेपद पटकावले. पुरुष गटात नूर सांबारी तर महिला गटात अनिशा च्यारी हिला उपविजेतेपद प्राप्त झाले.

गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांच्या सहकार्याने श्री देवी केळबाईच्या प्रांगणात झालेल्या या दोन दिवशीय अखिल गोवा महिला व पुरूष कॅरम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुरूष गटात 160 जणांनी तर महिला गटात 45 जणांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून गोवा फॉरवर्डचे स्थानिक नेते संतोषकुमार सावंत उपस्थित होते. यावेळी गोवा कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष निलेश जाधव, संघटनेचे सचिव दिनानाथ पिळर्णकर, खजिनदार दिलीप सावंत, समाजसेवक हरी नाईक, सिध्दनाथ क्रिडा व सांस्कृतिक क्लबचे अध्यक्ष गणपत गोसावी, निलेश गोसावी आणि अन्य उपस्थित होते.

आजच्या मोबाईल व टिव्हीच्या जमान्यात मुलांचा मैदानांशी संबंध तुटत चालला आहे. त्यातच 'कोविड' महामारीने मुलांना घरांमध्ये जेरबंदच करून ठेवले आहे. आता जराशी परिस्थिती निवळत असल्याने मुलांची मैदानांवर उपस्थिती पहायला मिळते. अशा मैदानी खेळातून आपली शारिरीक तंदुरुस्ती राखताना बुध्दीही तल्लख ठेवण्यासाठी त्याप्रकारचे खेळ खेळणे आवश्यक आहे. असे मत संतोषकुमार सावंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: सभापती म्हणून डॉ. गणेश गावकर यांचे पहिले अधिवेशन

Ponda By Election: रितेश, भाटीकर की आणखी कोण? फोंडा पोटनिवडणूक ठरणार विधानसभेची प्रिलीम

अग्रलेख: सरकारला दात आणि नखे असलेला 'लोकायुक्तरूपी वाघ' तरी कसा परवडला असता?

Chimbel: 'तोयार तलाव' नष्ट करणार का? चिंबल युनिटी मॉलविरुद्ध वाल्मिकी नाईकांचा एल्गार; प्रकल्प अन्यत्र हलवण्याचा दिला सल्ला

Bandora: ..झळाळती कोटी ज्योती या!बांदोड्यात गरजू कुटुंबाचे घर उजळले; सोलर पॅनलचा केला वापर

SCROLL FOR NEXT