पणजी फुटबॉलर्स विरुद्ध सेझा अकादमी सामना बरोबरीत

पणजी फुटबॉलर्सची स्पर्धेत पहिल्या गुणाची कमाई
गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल रविवारी पणजी फुटबॉलर्स व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात झालेल्या सामन्याचा क्षण.
गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल रविवारी पणजी फुटबॉलर्स व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात झालेल्या सामन्याचा क्षण.Dainik Gomantak

Goa Football: पणजी फुटबॉलर्सने यंदाच्या गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या गुणाची कमाई करताना रविवारी सेझा फुटबॉल अकादमीस गोलशून्य बरोबरीत रोखले. सामना म्हापसा येथील धुळेर (Duler-Mapusa Stadium) स्टेडियमवर झाला.

पणजी फुटबॉलर्सला अगोदरच्या लढतीत स्पोर्टिंग क्लबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी त्यांनी बचाव अभेद्य राखला. सेझा अकादमीची ही सलग दुसरी बरोबरी ठरली. यापूर्वीच्या लढतीत त्यांनी साळगावकर एफसीला गोलबरोबरीत रोखले होते. त्यांचे आता दोन लढतीनंतर दोन गुण झाले आहेत.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल रविवारी पणजी फुटबॉलर्स व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात झालेल्या सामन्याचा क्षण.
T20 World Cup 2021: रोहीत शर्मा अन् के. एल. राहुलच्या रुपात टीम इंडियाला मोठा झटका

सामन्याच्या प्रारंभी सेझा अकादमीस आघाडी घेण्याची संधी होती, पण ओमकार आरोंदेकर याचा फटका अडविता पणजी फुटबॉलर्सचा गोलरक्षक प्रेस्टन रेगो याने वेगाने हालचाल केली. त्यानंतर दोन्ही संघाने आक्रमणे केली, पण त्यांना यश लाभले नाही. त्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. सामन्याच्या भरपाई वेळेत सेझा अकादमीस गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र कुणालचा फटका पणजी फुटबॉलर्सचा बचावपटू धीरज चौहान याने यशस्वी होऊ दिला नाही.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल रविवारी पणजी फुटबॉलर्स व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात झालेल्या सामन्याचा क्षण.
Ind vs Pak T20: लोकप्रिय ज्योतिषाने केली भविष्यवाणी

वेळसाव-धेंपो लढत आज

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लब व धेंपो स्पोर्टस क्लब यांच्यात सामना होईल. धेंपो क्लबच्या खाती सध्या एक गुण आहे, तर वेळसाव क्लबला पहिली लढत गमवावी लागली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com