तनिशा क्रास्टोचे दुहेरीत यश

तनिशा क्रास्टो आहे राष्ट्रीय मिश्र दुहेरीतील विजेती
मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या तनिशा क्रास्टो व ईशान भटनागर (दोघेही मध्यभागी) यांना करंडक देताना मान्यवर.
मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या तनिशा क्रास्टो व ईशान भटनागर (दोघेही मध्यभागी) यांना करंडक देताना मान्यवर.Dainik Gomantak
Published on
Updated on

Badminton: बंगळूर येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन (International Challenge Badminton) स्पर्धेत गोव्याच्या तनिशा क्रास्टो (Tanisha Crasto) हिने दुहेरीत यश मिळविले. तिने मिश्र दुहेरीत छत्तीसगडचा ईशान भटनागर (Ishan Bhatnagar) याच्यासमवेत विजेतेपद, तर महिला दुहेरीत ओडिशाची ऋतुपर्णा पांडा हिच्यासमवेत उपविजेतेपद प्राप्त केले. तनिशाने हल्लीच सीनियर पातळीवर भारताचे सुदिरमन कप, तसेच थॉमस-उबेर कप स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. ती सध्याची राष्ट्रीय मिश्र दुहेरीतील विजेती आहेत.

मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या तनिशा क्रास्टो व ईशान भटनागर (दोघेही मध्यभागी) यांना करंडक देताना मान्यवर.
पणजी फुटबॉलर्स विरुद्ध सेझा अकादमी सामना बरोबरीत

बंगळूरमधील स्पर्धेतील अंतिम लढती रविवारी झाल्या. मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत तनिशा व ईशान जोडीने भारताच्याच के. साई प्रणित व गायत्री गोपीचंद पुल्लेला जोडीवर 21-16, 21-19 फरकाने मात केली. महिला दुहेरीतील अंतिम लढतीत तनिशा व ऋतुरपर्णा जोडीस ट्रिसा जॉली व गायत्री गोपीचंद पुल्लेला जोडीकडून 23-21, 21-14 फरकाने हार पत्करावी लागली. पुरुष एकेरीत प्रियांशू राजावत याने, तर महिला एकेरीत अनुपमा उपाध्याय यांनी विजेतेपद प्राप्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com