West Indias Team Dainik Gomantak
क्रीडा

WI vs SA: वेस्ट इंडिजचा 'हा' धाकड आफ्रिकन गोलंदाजांवर भारी, शानदार रेकॉर्ड केला नावावर

WI vs SA, 3rd T20: वेस्ट इंडिजचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. जिथे संघ तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळला.

Manish Jadhav

WI vs SA, 3rd T20: वेस्ट इंडिजचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. जिथे संघ तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळला. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 28 मार्च रोजी खेळला गेला.

उभय संघांमधील या सामन्यात फलंदाजांनी उभय संघाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. मात्र, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने 7 धावांनी विजय मिळवला.

विंडीज संघाच्या एका खेळाडूने अशी फलंदाजी केली की, कागिसो रबाडासारख्या धोकादायक गोलंदाजाची पळता भुई थोडी झाली.

9व्या क्रमांकावर उतरलेल्या फलंदाजाने रबाडाचा क्लास घेतला

9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या (West Indies) गोलंदाजाने ते केले जे प्रतिभावान खेळाडू करु शकले नाहीत.

काल खेळल्या गेलेल्या तिसर्‍या T20 सामन्यात वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या रोमारियो शेफर्डने वेगवान फलंदाजी केली. हा खेळाडू गोलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी त्याची खेळी पाहून कोणीही त्याला गोलंदाज म्हणणार नाही.

शेफर्डने कागिसो रबाडासारख्या (Kagiso Rabada) गोलंदाजाच्या एका षटकात 3 मोठे षटकार मारत 26 धावा ठोकल्या. त्याने 22 चेंडूत 44 धावांची धडाकेबाज खेळी केली. यासह शेफर्डच्या नावावर मोठा विक्रम झाला.

मोठा विक्रम केला

9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोमॅरियो शेफर्डने 22 चेंडूत 44 धावा ठोकल्या. यासह, वेस्ट इंडिजसाठी 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.

यापूर्वी, हा विक्रम फिरकी गोलंदाज सुनील नारायणच्या नावावर होता. त्याने 17 चेंडूत 30 धावा केल्या. एवढेच नाही तर शेफर्ड टी-20 क्रिकेटमध्ये 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

त्याच्या पुढे स्वित्झर्लंडचा फलंदाज अली नायर (15), ओमानचा नसीम खुशी (17) आणि पाकिस्तानचा अन्वर अली (3) आहेत.

डी कॉकने केएल राहुलला मागे टाकत एक पराक्रम आपल्या नावावर केला

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉकने भारतीय फलंदाज केएल राहुलला मागे टाकत एक पराक्रम आपल्या नावावर केला.

या सामन्यात डिकॉकने 21 चेंडूत 21 धावा केल्या. यासह डिकॉक दक्षिण आफ्रिकेसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

यासोबतच त्याने राहुललाही मागे सोडले. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डिकॉक आता राहुलच्या पुढे गेला आहे. आता तो 15 व्या क्रमांकावर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT