SA vs WI: द. आफ्रिकानं रचला इतिहास! T20I मध्ये तब्बल 259 धावांचा केला यशस्वी पाठलाग

वेस्ट इंडिजविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने रविवारी टी20 सामन्यात तब्बल 259 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
SA vs WI
SA vs WIDainik Gomantak
Published on
Updated on

South Africa vs West Indies: रविवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सेंच्युरियनला ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला गेला. ५०० पेक्षाही जास्त धावा झालेला हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात २५९ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.

सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २५९ धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने या आव्हानाचा पाठलाग १८.५ षटकात म्हणजेच ७ चेंडू बाकी ठेवत ४ विकेट्स गमावत पूर्ण केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना ६ विकेट्सने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेच सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा इतिहासही रचला आहे.

SA vs WI
SA vs WI: जॉन्सन चार्ल्सने रचला इतिहास, मोडले अनेक रेकॉर्ड; 39 चेंडूत ठोकले दणदणीत शतक

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून २५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटॉन डी कॉक आणि रिझ हेंड्रिक्स यांनी दमदार सुरुवात दिली. आक्रमक खेळणाऱ्या डी कॉरला हेंड्रिक्सने चांगली साथ देत सलामीला १५२ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान डी कॉकने ४३ चेंडूत शतकही पूर्ण केले.

ही भागीदारी डी कॉकच्या विकेटनेच तुटली. डी कॉकने ४४ चेंडूत ९ चौकार आणि ८ षटकारांसह १०० धावा केल्या. पण त्याच्या विकेटनंतरही दक्षिण आफ्रिकेने लय गमावली नाही. हेंड्रिक्सनेही तुफानी अर्धशतक झळकावले. तो २८ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा केल्या.

तसेच रिली रुसोवने १६ आणि डेव्हिड मिलरने १० धावांची खेळी केली. चार विकेट गेल्यानंतक कर्णधार एडेन मार्करमने हेन्रीच क्लासेनला साथीला घेत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. मार्करमने नाबाद ३८ धावांची खेळी केली, तसेच क्लासेनने नाबाद १६ धावांची खेळी केली.

SA vs WI
SA vs WI: 43 चेंडूत डी कॉकने ठोकले शतक, 'या' दिग्गजांना सोडले मागे

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, ओडेन स्मिथ, रेमंड रेफर आणि रोवमन पॉवेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने तोबडतोड शतकी खेळी केली. त्याने ४६ चेंडूत १० चौकार आणि ११ षटकारांसह ११८ धावांची खेळी केली. त्याला काईल मेयर्सने चांगली साथ दिली. मेयर्सने २७ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.

तसेच रोमारियो शेफर्डने १८ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी केली, तर कर्णधार रोवमन पॉवेलने १९ चेंडूत २८ धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने २० षटकात ५ बाद २५८ धावांचा डोंगर उभारला होता. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सिनने ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर वेन पार्नेलने २ विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com