Indian Cricketer Akshar Patel Dainik Gomantak
क्रीडा

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोठा बदल

भारतीय मुख्य संघातून फिरकीपाटू अक्षर पटेल बाहेर

Dainik Gomantak

T20 World Cup: यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. फिरकीपटू अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) 15 सदस्यांच्या मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे अक्षर पटेलला स्टँडबाय खेळाडूंमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

अक्षर पटेल आयपीएलमध्ये फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही, त्यातच अशा स्थितीत बीसीसीआयने टी -20 विश्वचषक संघात त्याला बॅकअप खेळाडू म्हणून समाविष्ट केले व शार्दुल ठाकूरला 15 सदस्यीय संघात समाविष्ट करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांच्यासह आता अक्षर पटेलही संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून असेल. याशिवाय, टीम इंडियाला मदत करण्यासाठी इतर खेळाडूंना विशेष फलंदाज आणि गोलंदाज म्हणून प्रवेश दिला गेला आहे, ज्यात अवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मरीवाला, व्यंकटेश अय्यर, करण शर्मा, शाहबाज अहमद आणि करिअप्पा गौतम यांचा समावेश आहे.

आयसीसी टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT