'धोनी है बडे दिल वाला', BCCI अध्यक्षांची 'माही'वर स्तुतीसुमने

जय शाह (Jai Shah) यांच्या या प्रस्तावाबद्दल धोनी सकारात्मक होता. परंतु त्याला संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) , प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा (Rohit Sharma) सारखे संघाचे मोठे खेळाडू यांच्यासोबत चर्चा करायची होती.
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी धोनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी धोनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. Dinik Gomantak

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jai Shah) यांनी महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाचे (Team India) मार्गदर्शक होण्यासाठी बोर्डाकडून पैसे घेणार नसल्याचा खुलासा केला आहे. त्याच्या या निर्णयाचे BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. जय शाह यांनी मंगळवारी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आगामी टी -20 विश्वचषकात (T20 World Cup) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील संघाला मार्गदर्शन देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) कोणतेही शुल्क आकारणार नाही.

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी धोनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
T20 World Cup: मार्गदर्शकाच्या भूमिकेचे धोनी मानधन घेणार नाही

टी -20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना होणार आहे. भारतासाठी ही स्पर्धा जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या महिन्यात टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली.

टीम इंडियाची घोषणा 9 सप्टेंबर रोजी करण्यात आली. तेव्हा सचिव जय शाह यांनी धोनीला मार्गदर्शक बनवण्याची घोषणा केली होती. जय शाह यांनी धोनीची मेंटॉर म्हणून नेमणूक केल्याची घोषणा केल्यावर क्रिकेट जगतालाही आश्चर्य वाटले. केवळ चाहत्यांनाच नाही तर क्रिकेटपटूंना आणि बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती नव्हती. एमएस धोनीचे नावही संघासोबत जाहीर करण्यात आले.

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी धोनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
T-20 World Cup 2021: भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमीच

जय शहा यूएईमध्ये टी -20 विश्वचषक ट्रॉफीचे लोकार्पण करण्यासाठी गेले होते. त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी धोनीशी या बाबत चर्चा केली. त्या काळात धोनी त्याच्या आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्ससोबत दुबईत होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 3 मोठ्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. जय शाह यांच्या या प्रस्तावाबद्दल धोनी सकारात्मक होता. परंतु त्याला संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा सारखे संघाचे मोठे खेळाडू यांच्यासोबत चर्चा करायची होती.

एमएस धोनीने आधी या ऑफरला सहमती द्यावी अशी जय शहा यांची इच्छा होती. यानंतर, तो संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी त्याला याबाबत चर्चा करता येईल. धोनीने हो म्हटल्यानंतर त्याने कोहली, शास्त्री आणि रोहित शर्माशी यावर चर्चा केली. प्रत्येकाने धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com