Virat, Rohit Dainik gomantak
क्रीडा

IND Vs PAK: राज की बात! टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बद्दल रोहीत म्हणाला...

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma Press Conference: T20 विश्वचषक 2022 मध्ये रविवारी (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. या सगळ्यामध्ये त्याने टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.

कॅप्टन रोहितचे धक्कादायक वक्तव्य

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग 11 बद्दल बोलाताना म्हणाला की, 'सर्व खेळाडू या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. आम्ही सामन्यापूर्वी प्लेइंग-11 ठरवू. येथील परिस्थितीनुसार प्रत्येक सामन्यात प्लेइंग-11 बदलण्याची गरज असेल तर आम्ही तेही करु.' रोहितच्या मते, या स्पर्धेत टीम इंडिया प्लेइंग 11 मध्ये सातत्याने बदल करताना दिसू शकते. तथापि, कर्णधार रोहित नेहमीच प्लेइंग 11 मध्ये कमी बदल करण्यासाठी ओळखला जातो.

मेलबर्नच्या हवामानावर असे सांगितले

पत्रकार परिषदेत मेलबर्नच्या हवामानाबाबत बोलताना रोहित म्हणाला की, 'लोक 40 षटकांचा सामना पाहण्यासाठी येतात. पाच षटकांचा सामना असेल तर खेळाडूंबरोबरच चाहत्यांचीही निराशा होते. आता उद्या हवामानाचे काय होणार हे देवालाच ठाऊक. पूर्ण सामना मिळाला तर बरे होईल, पण येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. मेलबर्नमध्ये सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यताही 50-60 टक्के वर्तवली जात आहे.'

टीम इंडियाचा वरचष्मा

T20 विश्वचषक स्पर्धेत भारत (India) आणि पाकिस्तान संघांमध्ये एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांपैकी टीम इंडियाने 5 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तान फक्त 1 सामना जिंकू शकला आहे. T20 विश्वचषक 2021 मध्ये दोन्ही संघांमध्ये एक सामना देखील खेळला गेला, ज्यामध्ये पाकिस्ताने (Pakistan) या स्पर्धेत प्रथमच भारताचा पराभव केला होता. अशा स्थितीत हा सामना खूप चुरशीचा होणार आहे, मात्र भारतासोबतच ही आकडेवारी दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT