India Vs Pakistan T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सामन्याच्या संघ निवडीबाबत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची चिंता वाढली आहे. भारतीय संघात तीन फिरकीपटू आहेत. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा कोणाला संधी देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हा अष्टपैलू खेळाडू नक्की खेळणार!
पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्यापूर्वी, डावखुरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल प्रशिक्षक राहुल द्रविडच्या देखरेखीखाली नेट सत्रात गोलंदाजी करताना दिसून आला. रवींद्र जडेजच्या (Ravindra Jadeja) दुखापतीनंतर त्याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. तो किलर बॉलिंग आणि डॅशिंग बॅटिंगमध्ये पारंगत आहे. त्याने टीम इंडियासाठी (Team India) 32 टी-20 सामन्यात 31 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत अष्टपैलू म्हणून त्याचे खेळणे निश्चित दिसते.
अश्विनकडे तगडा अनुभव
मात्र, पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरमध्ये फखर जमान, मोहम्मद नवाज आणि खुशदिल शाहसारखे डावखुरे फलंदाज आहेत. अशा स्थितीत रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. रविचंद्रन अश्विनकडे तगडा अनुभव आहे. अश्विनची T20 क्रिकेटमध्ये चार षटके खूप महत्त्वाची आहेत.
यजुवेंद्र चहलही मोठा दावेदार
अक्षर पटेलची जागा निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी संघातील दुसरा फिरकीपटू यजुवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. चहलने आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये 85 विकेट घेतल्या आहेत.
संघात अनेक बदल
भारतीय संघाने गेल्या वर्षभरात प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. यातील काही बदल वर्कलोड मॅनेजमेंटमुळे तर काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे झाले आहेत. अशा स्थितीत संघाला पुन्हा मजबूती द्यावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.