Rohit Sharma Test Cricket  Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Retirement: हिटमॅनच्या चाहत्यांना धक्का!! रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटला कायमचा अलविदा

Rohit Sharma Test Cricket Retirement: दीर्घकाळ कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याच्या निवड समितीच्या निर्णयानंतर रोहितने हा निर्णय जाहीर केलाय

Akshata Chhatre

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दीर्घकाळ कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याच्या निवड समितीच्या निर्णयानंतर रोहितने हा निर्णय जाहीर केलाय. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्या चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना धक्का बसलाय.

Rohit Sharma Test Retirement

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच भूमीत ३-० ने पराभूत केले, तर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतावर ३-१ ने विजय मिळवला. या पराभवांमुळे रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

सोशल मिडियावर निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्मा म्हणाला, "कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे, हे सांगताना मला खूप दुःख होत आहे.

पांढऱ्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी नेहमीच गौरवास्पद होते. गेल्या काही वर्षांत मिळालेल्या प्रेम आणि समर्थनासाठी मी सर्वांचे आभार मानतो. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळत राहीन."

रोहित शर्माने पर्थ येथील कसोटीत विश्रांती घेतली होती आणि तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला होता. मात्र, पुढील तीन सामन्यांत त्याची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्याने सिडनीमधील पाचव्या आणि अंतिम कसोटीतून स्वतःहून माघार घेतली होती. तरीही, रोहितला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करायचे होते.

भारताने २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याची बाजू अधिक मजबूत झाली होती, पण अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती रोहितला कर्णधार बनवण्याच्या बाजूत नव्हती आणि त्यांनी सदर माहिती बीसीसीआयला देखील पुरवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT