Rohit Sharma: रोहित शर्मा इतिहास रचण्यासाठी एक पाऊल दूर; फक्त 13 धावांची गरज, 'हा' विक्रम करणार

IND VS ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Rohit Sharma Record IND VS ENG 3rd ODI

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ९० चेंडूत ११९ धावा केल्या. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. या खेळीनंतर, चाहत्यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या सामन्यात त्याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

रोहितने या मालिकेतील शेवटच्या सामन्यात १३ धावा केल्या तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ११,००० धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनेल.

Rohit Sharma
Bomb Threat Goa: मुंबईतील पोलीस स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी, गोव्यातून कॉल; अवघ्या दीड तासांत पोलिसांनी आरोपीला असं शोधलं

२३ जून २००७ रोजी बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केल्यापासून रोहितने २६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,९८७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११,००० धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

विराट कोहलीने त्याच्या २३० व्या एकदिवसीय सामन्यातील २२२ व्या डावात ११००० धावांचा टप्पा ओलांडला होता.

Rohit Sharma
Goa Politics: ‘USA’त भारतीयांचा सन्मान राखण्यात सरकार अपयशी, अमित पाटकरांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

शतक झळकावले तर 'हा' विक्रम करणार

जर रोहितने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले तर तो सचिन तेंडुलकर आणि कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरेल.

क्रिकेटच्या तिन्ही फॅारमॅटमध्ये १०० शतके ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. यानंतर विराट कोहली येतो. त्याने आतापर्यंत ५४४ सामन्यांमध्ये ८१ शतकं झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

IND VS WI 1st ODI Rohit Sharma video
IND vs WI Rohit Sharma Virat Kohli Records
Rohit Sharma viral video World Cup statement
Team India Players Retirement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com