

डिचोली: गावाच्या अस्तित्वावर घाला घालणारा मेगा निवासी प्रकल्प गावात मुळीच नको, असा ठाम निर्धार कारापूरवासीयांनी केला असून, वेळप्रसंगी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यासही मागे राहणार नसल्याचे झालेल्या जाहीर सभेत स्पष्ट केले आहे.
कारापूर येथे दिल्लीस्थित मेगा निवासी प्रकल्प विरोधात संघटित झालेल्या कारापूरवासीयांची एक जाहीर सभा (रविवारी) सायंकाळी कारापूर येथे बोलाविण्यात आली होती. ''शिरानी'' येथे मोकळ्या मैदानावर आयोजित केलेल्या या सभेला सामाजिक कार्यकर्ते अभिजित प्रभूदेसाई, स्वप्नेश शेर्लेकर, ॲड. अजय प्रभूगावकर आणि स्थानिक पंचसदस्य उज्वला कवळेकर उपस्थित होत्या.
या सभेत मार्गदर्शन करताना अभिजित प्रभूदेसाई आणि स्वप्नेश शेर्लेकर यांनी वादग्रस्त मेगा प्रकल्पाची व्याप्ती आणि संभाव्य दुष्परिणाम याविषयी मुद्देसूद माहिती दिली. या प्रकल्पामुळे कारापूर गावचे अस्तित्व पूर्णपणे संकटात येईल. अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आमची जमीन आणि बागायती आम्हाला हव्या, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक वासंती गाड्डी हिने केली. यावेळी प्रितेश साळगावकर, आकाश सातार्डेकर, दत्ता धावस्कर, सिद्धेश तारी,प्रा.स्नेहा घाडी, कृष्णा घाडी, मेघनाथ परब गावकर आदींनी प्रकल्पा विरोधात भूमिका स्पष्ट करून संघटितपणे लढा देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन केले. डॉ. स्वप्निल सालेलकर यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.